Rashmika Mandanna's Escaped Death: मृत्यूपासून थोडक्यात बचावली रश्मिका मंदान्ना; फोटो शेअर करत सांगितली विमानाचे इमर्जन्सी लँडिंगची आपबीती
Rashmika Mandanna (PC - Instagram)

Rashmika Mandanna's Escaped Death: अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. नुकतेच रश्मिकाला एका समस्येला सामोरे जावे लागले. ती ज्या विमानाने प्रवास करत होती, त्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या घटनेने अभिनेत्री आणि तिच्या सहप्रवाशांना धक्का बसला. रश्मिका मंदान्नाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर विमानाच्या आतील फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर रश्मिकाच्या चाहत्यांनी तिच्याबद्दल चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

रश्मिका अभिनेत्री श्रद्धा दाससोबत प्रवास करत होती. रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर श्रद्धासोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे. अभिनेत्रीने फोटो शेअर करत लिहिले की, 'फक्त तुमच्या माहितीसाठी, आज आम्ही अशा प्रकारे मृत्यूपासून बचावलो.' रिपोर्ट्सनुसार, रश्मिका ज्या फ्लाइटमध्ये बसली होती ती मुंबईहून हैदराबादला जात होती. तांत्रिक बिघाडामुळे ती 30 मिनिटांनी पुन्हा मुंबईला परतली. या घटनेत कोणालाही दुखापत किंवा कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. (हेही वाचा -लवकरच अभिनेता Vijay Deverakonda आणि अभिनेत्री Rashmika Mandanna अडकणार विवाहबंधनात? फेब्रुवारीमध्ये साखरपुडा होण्याची शक्यता)

रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती तिच्या ॲनिमल चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. याशिवाय सध्या ती 'पुष्पा 2'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. (हेही वाचा - Rashmika Mandanna चा Deepfake व्हिडिओ व्हायरल; Amitabh Bachchan यांनी केली कायदेशीर कारवाईची मागणी)

Rashmika Mandanna (PC - Instagram)

रश्मिका पुन्हा एकदा साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात रश्मिका 'श्रीवल्ली'ची भूमिका पुन्हा साकारणार आहे. यासोबतच रश्मिका 'रेनबो' आणि 'द गर्लफ्रेंड' नावाच्या तेलुगू चित्रपटांसाठीही शूटिंग करत आहे. याशिवाय ती विकी कौशलसोबत 'छावा' या हिंदी चित्रपटात दिसणार आहे.