पाकिस्तानी कलाकारांवर बंदीबाबत अभिनेता रणवीर सिंग ह्याने दिली प्रतिक्रिया
Ranveer Singh (Photo Credits-Facebook)

पुलवामा (Pulwma) हल्ल्यानंतर पाकिस्तानी कालाकार आणि गायक यांच्यावर बंदी आणण्यात आली आहे. तसेच सिने असोसिएशनने (AICWA ) ही भारत (Indian) सरकारकडे त्यांना व्हिजा (Visa) देऊ नका याबाबत मागणी केली आहे. आता याबाबत अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) ह्याने आपले मत मांडले आहे.

रणवीर सिंग ह्याने इंडिया टूडेसोबत बातचीत करताना असे सांगितले की, लोक असे मानत होते की क्रिडा, कला आणि राजकरण यांचे एकत्रिकरण कधीच होऊ नये. या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या दोघांच्या सीमासुद्धा वेगळ्या आहेत. परंतु जवान आपल्या जीवाचे बलिदान देऊ शकतो तसे आम्ही कलाकर करु शकत नाही.(हेही वाचा-Surgical Strike 2: पाकिस्तानी कलाकारांना VISA देऊ नका,बॉलिवूडची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी)

यापुढे रणवीरने असे म्हटले की,जर कोणत्याही एका जवानाच्या घराती मंडळींना असे वाटत असेल की आपण पाकिस्तानची कला आणि खेळा संबंधित कोणतेही नाते ठेवण्यास नकार देत असल्यास त्याचे आपण पालन करायला हवे.

तसेच विंग कमांडर अभिनंदन भारतात परतल्यानंतर रणवीर सिंगने आनंद व्यक्त करत ट्वीट केले आहे. तसेच ट्वीटमध्ये अभिनंद तुमचे मायदेशात स्वागत आहे असे म्हटले आहे.