Gully Boy Teaser: रणवीर सिंगचा धमाकेदार हिप हॉप आणि आलियाचा शानदार अंदाज, 'गली बॉय' टीझर प्रदर्शित
आलिया भट आणि रणवीर सिंह (फोटो सौजन्य-Youtube)

बॉलिवूड कलाकार रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा आगामी चित्रपट 'गली बॉय' (Gully Boy) चा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरच्या माध्यमातून रणवीर सिंगचा धमाकेदार हिप हॉप पाहायला मिळणार आहे. त्याचसोबत आलिया भट्ट ही सुद्धा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षाकांच्या भेटीला येणार आहे. तसेच कल्कि कोचलिन ही या टीझरमध्ये झळकली आहे. टीझर खुप मनोरंजनात्मक असून या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहीली आहे. तसेच गली बॉयचे पोस्टर ही प्रदर्शित करण्यात आले होते. आता लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर 9 जानेवारीला प्रदर्शित करण्यात येणार आहे.

'गली बॉय' या चित्रपटाच्या टीझरच्या शेवटी रणवीर सिंगने असे सांगितले आहे की, भारतातील खऱ्या हिप हॉप कालाकाराची तो भेट घालून देणार आहे. त्याचबरोबर रणवीरच्या अभिनयाची सर्व प्रेक्षकांवर छाप पडणार आहे. त्यामुळे टीझर पाहिल्यावर प्रेक्षकांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला जाऊन पोहचणार आहे.

तसेच झोया अख्तर हिने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. तर रॅपर नावेद शेख याच्या आयुष्याची खरी कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्यात आली आहे. या चित्रपटाची निवड बर्लिन इंटरनॅशल फिल्म फेस्टिव्हलसाठी करण्यात आली होती. येत्या 14 फेब्रुवारी, 2019 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.