Ranbir Kapoor आणि Alia Bhatt चं लग्न पुढे ढकललं! जाणून घ्या या जोडप्याच्या घरी पुन्हा कधी सनई-चौघडे वाजणार
Ranbir Kapoor and Alia Bhatt (PC - Instagram)

Ranbir Kapoor and Alia Bhatt Wedding Postponed: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि क्यूट अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रणबीर आणि आलियाला चाहते प्रेमाने रालिया म्हणतात. रणबीर आणि आलियाच्या चाहत्यांसाठी एक बातमी समोर आली आहे, जी त्यांना आवडणार नाही. कारण, आता या दोघांचे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. या दोघांचे लग्न एप्रिलमध्ये होणार होते. रणबीर आलिया 2022 मध्ये लग्न करणार असले तरी लग्नाचा महिना बदलला आहे.

एप्रिलमध्ये नाही होणार लग्न -

आलिया भट्टच्या नुकत्याचं प्रदर्शित झालेल्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील तिच्या भूमिकेची चाहते खूपचं प्रशंसा करत आहे. गंगूबाईनंतरही तिचे अनेक प्रोजेक्ट बाकी आहेत. याशिवाय रणबीर कपूरही त्याच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गेल्या वर्षी हे जोडपे लग्नबंधनात अडकणार होते. पण कोविडमुळे लग्न पुढे ढकलले गेले. त्याच वेळी, हे जोडपे एप्रिल 2022 मध्ये लग्न करणार असल्याची बातमी समोर आली. पंरतु, आता एप्रिलमध्येही हे कपल लग्नबंधनात अडकणार नसल्याचे बोलले जात आहे. (वाचा - Runway 34 Motion Poster: अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित, चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला)

ऑक्टोबर 2022 मध्ये होऊ शकते लग्न -

एका रिपोर्टनुसार आता हे जोडपे ऑक्टोबर 2022 मध्ये लग्न करणार आहेत. मात्र, अद्याप या दोघांकडून लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दैनिक भास्करने एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, रणबीर-आलियाच्या लग्नाच्या तारखा मागे-पुढे का ढकलत आहेत हे कोणालाही माहिती नाही. या जोडप्याचं नवीन घर कृष्णा राज अद्याप तयार झालेले नाही. अपेक्षेप्रमाणे, हे घर सुमारे 18 महिन्यांत तयार होईल.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. ब्रह्मास्त्र व्यतिरिक्त रणबीर कपूर एनिमल आणि शमशेरा चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय आलिया भट्टबद्दल बोलायचे झाले तर ब्रह्मास्त्र व्यतिरिक्त ती 'आरआरआर', 'रॉकी' आणि 'राणी की प्रेम कहाणी', 'डार्लिंग्स', 'जी ले जरा' आणि 'तख्त' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.