Chhota Rajan साठी ऑक्सिजन आणि बेडची मागणी करणा-या Ram Gopal Varma भडकले लोक, दिग्दर्शकला केले Troll
Ram Gopal Varma (फोटो सौजन्य- फेसबुक)

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन (Chhota Rajan) याच्या मृत्यूची अफवा वा-यासारखी सर्वत्र पसरली. कोरोनामुळे छोटा राजनचे निधन झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र व्हायरल झालेली ही बातमी अफवा असल्याचे सांगण्यात आले. एम्स रुग्णालयाकडून छोटा राजन संबंधी स्पष्टीकरण देण्यात आले की, तो जिवंत आहे आणि त्याच्यावर उपचार सुरु आहे. या बातमीनंतर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी छोटा राजनला ऑक्सिजन आणि बेडची सुविधा मिळवून देण्याची मागणी केल्याने लोक त्याच्यावर चांगलेच भडकले आहेत.

राम गोपाल वर्मा यांनी छोटा राजनसाठी ट्विट करून बेड्स आणि ऑक्सिजनची मागणी केली. हे ट्विट पाहून नेटकरी चांगलेच संतापलेत. 'तुम्ही छोटा राजनवर चित्रपट बनवणार आहात का?' असे अनेकांनी ट्रोल करत त्यांना सवाल केला आहे.हेदेखील वाचा- Chhota Rajan च्या मृत्यूच्या बातम्या खोट्या; दिल्लीच्या AIIMS रूग्णालयात COVID 19 चे उपचार घेत असल्याची माहिती

'असे करण्यापेक्षा तुम्ही सध्याच्या कठिण परिस्थितीत तुम्ही गरजूंना मदत का करत नाही' असे सवालही अनेकांनी विचारला आहे.

26 एप्रिल 2021 ला दिल्लीच्या एम्स रूग्णालयात (AIIMS Delhi) छोटा राजनला कोविड 19 (COVID 19) ची लागण झाल्यानंतर उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. छोटा राजन तिहार जेल (Tihar Jail) मध्ये होता. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला इतर कैद्यांपासून दूर ठेवले जात असे पण जेल अधिकार्‍यांच्या मार्फत त्याला कोरोनाची लागण झाली असू शकते असा संशय आहे. त्याच्यावर एम्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत.