Chhota Rajan च्या मृत्यूच्या बातम्या खोट्या; दिल्लीच्या AIIMS रूग्णालयात COVID 19  चे उपचार घेत असल्याची माहिती
Chota Rajan Dies OF COVID 19 | Photo Credits: Twitter/ Vilas Bade

कोरोनाबाधित कुख्यात गुंड छोटा राजन (Chhota Rajan) याला कोरोनाची (Coronavirus)  लागण झाल्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अशा बातम्या समोर आल्या होत्या. पण काही वेळापूर्वीच AIIMS कडून तो उपचार घेत  असल्याचे आणि जीवंत असल्याचे सांगण्यात आले आहे.  26 एप्रिल 2021 ला दिल्लीच्या एम्स रूग्णालयात (AIIMS Delhi) छोटा राजनला कोविड 19 (COVID 19)  ची लागण झाल्यानंतर उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. छोटा राजन तिहार जेल (Tihar Jail) मध्ये होता. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला इतर कैद्यांपासून दूर ठेवले जात असे पण जेल अधिकार्‍यांच्या मार्फत त्याला कोरोनाची लागण झाली असू शकते असा संशय आहे. त्याच्यावर एम्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

कारागृह अधिकार्‍यांच्या माहितीनुसार छोटा राजनला सहव्याधी आहेत. तो 62 वर्षांचा आहे. तिहार जेल मध्ये मागील काही दिवसांत कैद्यांमध्ये कोविड 19 ची लागण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कमी जागेत अनेक कैदी असल्याने हा संसर्गात देशभर कैद्यांमध्येही झपाट्याने वाढत आहे. दिल्ली मध्ये वाधती रूग्णसंख्या आणि अपुरी यंत्रणा यामुळे आरोग्य यंत्रणेचे आधीच तीन तेरा वाजले आहेत.

छोटा राजन हा भारतातील मोस्ट वॉन्टेड गॅंगस्टर होता. 2 दशकं भारतीय ऑफिसरच्या हातावर तुरी देऊन पळणार्‍या छोट्या राजनला 2015 साली इंडोनेशियाच्या बाली मधून पकडण्यात आले होते. त्याच्यावर 68 विविध केसेस आहेत. त्यापैकी 28 केसेस या महाराष्ट्रात खंडणीच्या आहेत. 2000 साली छोटा राजन भारतातून परदेशात पळून गेला होता.