Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding: रकुल प्रीत आणि जॅकीचे डेस्टिनेशन वेडिंग गोव्यात होणार; लग्नाची पत्रिका आली समोर
Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding (PC/X@Dev_Discourse)

Rakul Preet Singh-Jackky Bhagnani Wedding: रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) लवकरच गोव्यात (Goa) लग्नबंधनात अडकणार आहेत. या जोडप्याने अद्याप काहीही उघड केलेले नाही, परंतु या जोडप्याच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान, त्यांच्या लग्नाची पत्रिकाही (Wedding Card) सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. लग्नाआधीच रकुल प्रीत-जॅकीची लग्नपत्रिका चर्चेचा विषय बनली आहे. रकुल आणि जॅकी यांच्या लग्नपत्रिकेची थीम लोकांना पसंत पडली आहे. एवढेच नाही तर ही थीम लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर लग्नपत्रिका मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रकुल प्रीत-जॅकीच्या लग्नाची पत्रिका -

रकुल प्रीत-जॅकीच्या लग्नपत्रिकेवरून लग्न कोणत्या थीमवर असेल याची झलक पाहायला मिळते. दोघांचे लग्न कोणत्या ठिकाणी होणार आहे आणि ते कसे दिसेल हे देखील या कार्डमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. या पत्रिकेवर पांढ-या आणि निळ्या रंगांसह ग्रीस आधारित थीमची झलक मिळत आहे. दुसऱ्या बाजूला समुद्रकिनारी मंडप दिसत आहे. दरम्यान त्याचा #AbDonobhagnaNi हा हॅशटॅगही व्हायरल होत आहे. त्यामुळेच रकुल प्रीत-जॅकीच्या लग्नपत्रिकेची थीम लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. (हेही वाचा - अभिनेत्री Rakul Preet Singh ची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; NCB अहवाल सादर करेपर्यंत, माध्यमांना आपल्या बातम्या प्रसारित न करण्याच्या सूचना देण्याची केली विनंती)

येथे पहा फोटो -

मात्र, रकुल प्रीत किंवा जॅकी भगनानी या दोघांनीही त्यांच्या लग्नाचे कार्ड शेअर केलेले नाही किंवा त्याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. या जोडप्याच्या घरात भव्य लग्नाची तयारी सुरू झाली आहे. सोशल मीडियावर रकुल प्रीत-जॅकीच्या घराचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये या जोडप्याच्या घरी दिवे चमकताना दिसत आहेत. बी टाऊनच्या नव्या कपलच्या लग्नाचं काउंटडाऊन सुरू झालं आहे. (हेही वाचा - Money Laundering Case: Rakul Preet च्या अडचणी वाढल्या; मनी लाँड्रिंग प्रकरणात ED ने पाठवले समन्स)

जॅकी भगनानीची नववधू रकुल प्रीत सिंग सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ती 21 फेब्रुवारीला गोव्यात चित्रपट निर्माता आणि अभिनेता जॅकी भगनानीसोबत लग्न करणार आहे. रकुल प्रीतने 2014 मध्ये 'यारियां' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. रकुल प्रीत 'मेरी पत्नी का रिमेक' आणि कमल हसनचा 'इंडियन 2' मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे.