Rakhi Sawant | (Photo Credit Facebook

राखी सावंत (Rakhi Sawant) हिला मुंबई पोलिसांनी अटक (Rakhi Sawant Arrested: By Mumbai Police) केल्याचे वृत्त आहे. राखीला सुरुवातीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती होती. मात्र, आता तिला अटक झाल्याचे वृत्त पुढे आले आहे. घेतले आहे. राखी सावंत हिने आपले अनुचित छायाचित्र आणि व्हिडिओ व्हायरल केल्याची तक्रार एका महिला मॉडेलने दिली होती. प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाल्यानंतर अंबोली पोलिसांनी (Amboli Police) राखी सावंत हिला ताब्यात घेतले. पुढील चौकशीसाठी तिला अंबोली पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.  मराठी बिग बॉस पर्व चौथे नुकतेच पार पडले. बिग बॉसच्या चौथ्या पर्वात राखी एक स्पर्धक म्हणून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या पर्वातीही तिने हिंदी बिग बॉस प्रमाणेच धमाल केल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले.

राखी सावंत ही अभिनेत्री, मोडॉल, डान्सर आणि सोशल मीडिया एन्फ्यूएन्सर आहे. आपल्या वादग्रस्त वर्तन आणि विधानांमुळे ती नेहमी चर्चेत असते. तिच्याविरोधात शर्लिन चोपडानामक अभिनेत्री, मॉडेलने तक्रार दिली होती. तिच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सांगितले जात आहे की, राखी सावंत आज (19 जानेवारी) दुपारी 3 वाजता तिच्या डान्स अकादमीचा शुभारंभ करणार होती. ज्यात तिचा पती आदिल दुर्रानी याची भागिदारी आहे. दरम्यान, तत्पूर्वीच अंबोली पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. (हेही वाचा, Rakhi Sawant Miscarriage: राखी सावंतचा झाला गर्भपात? माध्यमांच्या वृत्तांवर पती Adil Khan Durrani ने केला धक्कादायक खुलासा)

ट्विट

शर्लिन चोपडा हिने ट्विटरवर राखी सावंत हिच्या अटकेची माहिती सर्वांना दिली. शर्लिनने ट्विट केले की, "आंबोली पोलिसांनी राखी सावंतला एफआयआर 883/2022 संदर्भात अटक केली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने काल राखी सावंतचा ABA 1870/2022 फेटाळला आहे."

ट्विट

राखी सावंत हिने मागील वर्षी #MeToo आरोपी साजिद खान विरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल शर्लिन चोप्रा हिच्यावर टीका केली होती. साजिद खान विरोधात जवाब नोंदवल्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी मीडियाशी बोलताना शर्लिननने सलमान खान चित्रपट निर्मात्याचे संरक्षण करत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, राखी सावंत हिने साजिद खान याची पाठराखण करत शर्लिन चोप्रा हिच्यावर टीका केली होती. राखीने शर्लिन चोप्रा हिला उद्देशून म्हटले होते की, पोलिसांना चांगलेच माहिती आहे की, कोणत्या तक्रारीत सत्यता आहे आणि नाही.