Rakhi Sawant Miscarriage: राखी सावंतचा झाला गर्भपात? माध्यमांच्या वृत्तांवर पती Adil Khan Durrani ने केला धक्कादायक खुलासा

यापूर्वी राखी तिच्या प्रेग्नेंसीच्या बातमीवर प्रतिक्रिया देण्यास नकार देत होती, मात्र आता तिने या प्रकरणावर मौन तोडत धक्कादायक खुलासा केल्याचे माध्यमांनी म्हटले आहे. राखीचा गर्भपात झाल्याची बातमी अनेक माध्यमांनी दिली आहे.

Rakhi Sawant Miscarriage: राखी सावंतचा झाला गर्भपात? माध्यमांच्या वृत्तांवर पती Adil Khan Durrani ने केला धक्कादायक खुलासा
राखी सावंत (Photo Credits: Yogen Shah)

गेले अनेक महिने अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. नुकतेच तिचे मागच्या वर्षी बॉयफ्रेंड आदिल खानशी (Adil Khan Durrani) लग्न झाल्याची बातमी आली होती. सुरुवातीला आदिलने लग्न झाल्याचे वृत्त फेटाळले मात्र नंतर त्याने माध्यमांसमोर येऊन राखीचे व आपले लग्न झाल्याचे मान्य केले. आता माध्यमांनी राखी सावंतची प्रेग्नेंसी व गर्भपाताबाबत अहवाल प्रसिद्ध केले आहेत.

राखी सावंत प्रेग्नंट होती, असा खुलासा फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर केला आहे. विरल भयानीने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्याने राखी सावंतशी संभाषण झाल्याचे सांगितले होते. या संभाषणामध्ये राखीने सांगितले आहे की, बिग बॉस मराठी शोमध्ये तिने आपण गरोदर असल्याची घोषणा केली होती, मात्र याला कोणीही गंभीरतेने घेतले नाही. आता आपला गर्भात झाल्याचा धक्कादायक खुलासा राखी सावंतने केला आहे.

यापूर्वी राखी तिच्या प्रेग्नेंसीच्या बातमीवर प्रतिक्रिया देण्यास नकार देत होती, मात्र आता तिने या प्रकरणावर मौन तोडत धक्कादायक खुलासा केल्याचे माध्यमांनी म्हटले आहे. राखीचा गर्भपात झाल्याची बातमी अनेक माध्यमांनी दिली आहे. परंतु त्यानंतर विरल भयानीने ही पोस्ट काढून टाकली आहे. दुसरीकडे, राखीनंतर आता तिचा कथित पती आदिल खानने तिच्या गरोदरपणाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. (हेही वाचा: Urfi Javed Vs Chitra Wagh: उर्फी जावेदची महिला आयोगात धाव तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं उर्फीला प्रत्त्युत्तर)

आदिल खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने राखी सावंतचा गर्भपात झाल्याची बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. तसेच असे खोटे वृत्त पब्लिश न करण्याचे आवाहनही त्याने केले आहे. या पोस्टनंतर राखीचे चाहते पुन्हा संभ्रमात पडले आहेत. राखीचा खरच गर्भपात झाला आहे की, पुन्हा एकदा प्रसिद्धी साठी ती ड्रामा करत आहे आहे, याबाबत ते साशंक आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jan 18, 2023 06:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).