अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद आता दिवसेंदिवस शिगेला पेटत चाल्ला आहे. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर उर्फी जावेद विरुध्द चित्रा वाघ यांचा वाद चांगलाचं रंगला आहे. तरी सोशल मिडीयावर रंगलेल्या या लढाईनंतर आता मुंबई पोलिसांनी अभिनेत्री उर्फी जाधव विरोधात सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली होती. त्यामुळे उर्फी जावेदच्या अडचणीत वाढ झाली आहे. तरी मुंबई पोलिसांच्या नोटिशीनंतर अभिनेत्री उर्फी जावेदने पोलिस स्थानकात हजर राहून जबाब देखील नोंदवला आहे. या जबाबात उर्फी जावेदने स्वतच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंचे खापर पापाराझींवर फोडले आहे. तरी आता चित्रा वाघ यांनी मला धमकावले असून मला असुरक्षित वाटू लागल्याने सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी उर्फिने महिला आयोगाकडे केली आहे.
तर यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्त्युत्तर देत म्हणाल्या मला धमक्या देण्याची गरज नाही, मी फक्त इशारा दिला असल्याचं प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी दिले आहे. तसेच उर्फी जावेदला मी कुठलीही धमकी दिली नसल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या. मात्र मी तिला इशारा दिला असून उर्फीने अशी नागडी उघडी फिरू नको असं म्हण्टलं आहे. तोकडे कपड्यांवरून चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यात चांगलीचं जुगबंदी रंगली आहे. आता भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वादचे राज्यात काय पडसाद उमटणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. (हे ही वाचा:- Urfi Javed Nudity Row: अमृता फडणवीस यांचा उर्फी जावेदला पाठींबा; म्हणाल्या- 'महिला म्हणून तिने जे काही केले आहे त्यात काहीही चुकीचे नाही')
दुसऱ्या बाजूला अभिनेत्री उर्फी जाधवने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात उर्फी म्हणाली, मी एक स्वातंत्र्य व्यक्ती आहे. मला शूट करायला आणि विशिष्ट ड्रेस घालायला आवडते. या घटनेत कुठलाही गुन्हा नाही. जेव्हा मी अशा शूटसाठी बाहेर पडते तेव्हा पापाराझी मला शोधतात,मला फॉलो करतात, ते फोटो क्लीक करतात आणि मग फोटो व्हायरल होतात. मी ते व्हायरल करीत नाही असा जबाब नोंदवत स्वतच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंचे खापर उर्फीने पापाराझींवर फोडले आहे.