Rajinikanth Warning to Brands: रजनीकांत चिडल्यावर काय होतं? विविध कंपन्या आणि ब्रँड्सना आला अनुभव
Rajinikanth | (Photo Credit - Twitter)

अभिनेता रजनीकांत (Rajinikanth) आणि त्याचे जोक आता लोकांच्या सवयीचा भाग झाले आहेत. म्हणजे रजनीकांतचे शोध, रजनीकांतची कल्पनाशक्ती, रजनीकांत यांचा राग (Rajinikanth Gets Angry) वगैरे वगैरे. पण रजनीकांत यांना खरोखरच जेव्हा राग येतो तेव्हा तो काय करतो? खरे तर त्याने या प्रश्नाचे उत्तर स्वत:हून दिले नाही. पण त्याच्या एका कृतीतून मात्र त्याच्या चाहत्यांना आणि अनेकांना हे उत्तर मिळाले आहे. रजनीकांत (Rajinikanth Legal Action) याला राग आल्यावर तो का करतो यासोबतच काय होते याचेही उत्तर अनेकांना मिळाले आहे. प्रामुख्याने विविध नामवंत कंपन्या आणि ब्रँड्सना.

नेमके काय घडले? रजनीकांत का चिडले?

त्याचे झाले असे काही कंपन्या रजनीकांत यांची स्टाईल, आवाज आणि साधर्म्य असलेल्या इतर अनेक गोष्टी चोरुन वापरतात असे त्यांच्या लक्षात आले. चोरुन वापरतात याचा अर्थ असा की, रजनीकांत यांची अधिकृत परवानगी न घेता या कंपन्या आपल्या उत्पादनांची जाहीरात करण्यासाठी, रजनीकांत यांच्या आवाजाची, प्रतिमेची किंवा रजनीकांत यांच्याशी साधर्म्य असलेल्या अनेक गोष्टींचा वापर करतात. जेव्हा रजनीकांत यांना ही गोष्ट लक्षात आली तेव्हा ते भरतेच चिडले. (हेही वाचा, मोठी घोषणा: रजनीकांत आगामी लोकसभेची निवडणूक लढवणार नाहीत, पक्षाचीही माघार)

अभिनेते रजनीकांत यांनी ब्रँड्स आणि कंपन्यांना व्यावसायिक हेतूंसाठी त्यांची प्रतिमा आणि इतर साधर्म्याचा वापर करणाऱ्यांना कठोर इशारा दिला आहे. रजनीकांत यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, आपली प्रतिमा, नाव अथवा साधर्म्य असलेल्या इतर गोष्टींचा वापर पूर्वपरवानगी न घेता अथवा इतर कोणत्याही अनधिकृतरित्या केला तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

कायदेशीर कारवाईचा इशारा

रजनीकांत हा अभिनेता भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वात लोकप्रिय सुपरस्टार्सपैकी एक आहे. पॉप कल्चर आयकॉन म्हणून त्याचे स्थान अनेक ब्रँड्सना त्यांच्या जाहिरातींमध्ये त्याच्या प्रतिमेचा वापर करण्यास आकर्शित करते. त्यामुळे रजनीकांत यांच्या कायदेशीर विभागाने (लिगल टीम) एक नवेदन जारी करत कंपन्या आणि ब्रँड्सना रजनीकांत यांच्या प्रतिमा, नाव अथवा इतर गोष्टींचा वापर अनधिकृत करुन ये असा सल्ला दिला आहे. तसेच, तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा दिला आहे.

मिमीक्री, नक्कल यांवर मर्यादा

रजनकांतचे वकील सुब्बिया इलांभराथी (Subbiah Elambharathi) यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात, ब्रँड्सना चेतावणी देण्यात आली आहे की 'कोणीही त्यांच्या (रजनीकांत) व्यक्तिमत्त्वाचे/प्रसिद्धीचे/सेलिब्रेटी अधिकारांचे उल्लंघन करत असेल' त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. याचा अर्थ असा की त्यांच्या चेहऱ्याची, वर्तनाची आणि आवाजाची नक्कल करणे आणि त्याचे अनुकरण करणे देखील उल्लंघन मानले जाईल.