सलमान खान (Salman Khan) आणि दिशा पाटनी (Disha Patani) स्टारर ‘राधे-युअर मोस्ट वॉन्टेड भाई’चा (Radhe: Your Most Wanted Bhai) ट्रेलर रिलीज झाला आहे. सलमान खानच्या चाहत्यांसाठी राधेचा ट्रेलर हा एखाद्या गिफ्टपेक्षा कमी नव्हता. तसेच यामध्ये पहिल्यांदा सलमान खानला किस करताना पाहणे हे तर डबल सरप्राइज होते. सलमान खानने प्रथमच एका चित्रपटात लिप किसिंग सीन दिला आहे, ज्याची बर्यापैकी चर्चा होत आहे. आता या सिनेमातील दिशाबरोबरच्या किसिंग सीनबाबत सलमान खानने मौन सोडले आहे. सलमानने सांगितले आहे की, या चित्रपटात त्याचा एक किसिंग सीन आहे पण तो दिशासोबत नसून, तो एका टेपवर आहे.
सलमान खान फिल्म्सने नुकताच चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ रिलीज केला आहे, ज्यामध्ये सलमान आणि दिशाच्या त्या किसिंगबद्दलचे सत्य समोर आले आहे. याआधी या किसिंग सीनबद्दल एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दिसून आले होते की दिशाच्या ओठांवर एक टेप आहे व सलमान खान त्या टेपवर किस करत आहे. मात्र ज्याप्रकारे या सीनचे चित्रीकरण केले आहे, ते पाहून असे वाटते की सलमान खान दिशाच्या ओठांवर किस करत आहे. आता मेकिंग व्हिडीओ मध्ये सलमान खानने तो दिशाच्या ओठांवर नाही तर, टेपवर किस करत असल्याचे सांगितले आहे. (हेही वाचा: Aamir Khan च्या '3 इडियट्स' चित्रपटात Kareena Kapoor ने केलेल्या भूमिकेसाठी Anushka Sharma ने दिली होती ऑडिशन; वाढदिवसानिमित्त पहा अभिनेत्रीचा Unseen Video)
View this post on Instagram
या मेकिंग व्हिडीओमध्ये चित्रपटाचे शुटींग कसे केले गेले हे दाखवले आहे. विशेषतः यामध्ये एक्शन सिन्स कसे शूट केले हे पाहणे रंजक आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर व त्यानंतर 2 गाणी रिलीज केली आहेत, ज्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत दिशा पटानी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हूडा यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट 13 मे रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये तसेच झी-5 आणि झी सिनेप्लेक्स सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'पे पर व्ह्यू' नुसार प्रदर्शित होईल.