Aamir Khan च्या '3 इडियट्स' चित्रपटात Kareena Kapoor ने केलेल्या भूमिकेसाठी Anushka Sharma ने दिली होती ऑडिशन; वाढदिवसानिमित्त पहा अभिनेत्रीचा Unseen Video
अनुष्का शर्मा (Photo Credits: Youtube)

Happy Birthday Anushka Sharma: बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अनुष्का शर्मा आज आपला 33 वा वाढदिवस साजरा करीत आहे. अनुष्का आज केवळ एक अभिनेत्रीच नाही तर एक चित्रपट निर्माता आणि बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री आहे. अनुष्काने शाहरुख खानसमवेत (Shah Rukh Khan) 'रब ने बना दी जोडी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता, त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. अनुष्काने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले असून बॉलिवूडमध्ये स्वत: चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

इतर कलाकारांप्रमाणेचं अनुष्कालाही बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणं हा मोठा संघर्ष होता. तुम्हाला माहिती आहे काय, अनुष्काने आमिर खानच्या '3 इडियट्स' चित्रपटामध्ये करीना कपूरच्या भूमिकेसाठी ऑडिशनही दिले होते. अभिनेत्रीच्या ऑडिशनचा व्हिडिओ तुम्ही आजही पाहू शकता. ज्यामध्ये ती म्हणत आहे की, “2007 मध्ये मी एका चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी ऑडिशन दिले होते आणि तो चित्रपट 3 इडियट्स होता. हे कोणालाही माहित नाही किंवा कोणीही माझे ऑडिशन पाहिले नाही. राजू सर यांनीही मला ही ऑडिशन देताना पाहिलं नाही." (वाचा - Akshay Kumar ने सोशल मिडियाद्वारे सांगितल्या कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी '4' महत्त्वाच्या कृती)

यानंतर राजकुमार हिरानी विचारतात, "अनुष्काने 3 इडियट्ससाठीही ऑडिशन दिले? नाही, अनुष्काने 3 इडियट्ससाठी कधीचं ऑडिशन दिले नव्हते." ऑडिशन दरम्यान अनुष्काने चित्रपटाच्या शेवटी सादर झालेल्या 'मुन्नाभाई एमएमबीबीएस' चित्रपटावरील ग्रेसी सिंगचा डायलॉग बोलला. ऑडिशनचा व्हिडिओ पाहिल्यानंतर शेवटी आमिर आणि राजकुमार हिरानी यांना धक्का बसला.

दरम्यान, '3 इडियट्स'मध्ये करीना कपूर खानला रोल देण्यात आला. ज्या भूमिकेसाठी अनुष्का शर्माने ऑडिशन दिली होती. अनुष्का कदाचित '3 इडियट्स'मध्ये आमिरबरोबर काम करू शकली नाही. पण नंतर तिला' पीके, संजू सारख्या हिट चित्रपटात आमीरबरोबर काम करण्याची संधी मिळाली.