Vedaant Madhavan, R. Madhavan (PC - ANI)

Danish Open 2022: अभिनेता आर. माधवन (R. Madhavan) चा मुलगा वेदांत माधवन (Vedaant Madhavan) याने डॅनिश ओपन 2022 (Danish Open 2022) मध्ये जलतरणात सुवर्णपदक (Gold Medal) जिंकले आहे. वेदांतने 800 मीटर जलतरण स्पर्धेत पदक जिंकले आणि 8:17.28 अशी वेळ नोंदवली. आर. माधवनने एक क्लिप शेअर केली आहे. ज्यामध्ये सत्कार समारंभात वेदांतच्या नावाची घोषणा केली जात आहे. अभिनेत्याने इंस्टाग्राम हँडलवर क्लिप शेअर करत लिहिले आहे की, "सुवर्ण... तुम्हा सर्वांना आशीर्वाद आणि देवाच्या कृपेने सर्वात मोठा विजय मिळाला आहे. आज वेदांत माधवनने 800 मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. या विजयाने भारावून गेलो असून नम्र झालो आहे." पोस्टमध्ये त्यांनी वेदांतचे प्रशिक्षक, जलतरण महासंघ आणि संपूर्ण संघाचे आभार मानले आहेत.

आर माधवनने पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचचं इंडस्ट्रीतील लोक आणि चाहत्यांनी अभिनेत्याला कमेंट करून शुभेच्छा दिल्या. शिल्पा शिरोडकरने लिहिले, "एकदम आश्चर्यकारक मॅडी. आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण. माझ्या प्रिय वेदांत माधवन तुला खूप प्रेम आणि आशीर्वाद. अभिनंदन..." (हेही वाचा - Fastest Ball in IPL 2022: कडक ना! गुजरातच्या ‘या’ धाकड गोलंदाजाने टाकला स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू, हैदराबादच्या उमरान मलिक ला पछाडून काबीज केला No 1 क्रमांक)

शनिवारी आर माधवनच्या मुलाने त्याच जलतरण स्पर्धेत वेगळ्या प्रकारात रौप्यपदक जिंकले. त्याने 1500 मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आणि 15:57:86 अशी वेळ घेतली. क्लिप शेअर करताना अभिनेत्याने लिहिले, "वेदांत माधवनने कोपनहेगनमधील डॅनिश ओपनमध्ये भारतासाठी रौप्यपदक जिंकले. आम्हाला खूप अभिमान आहे."

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

आर माधवन यांचा मुलगा वेदांत याने अनेक आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कांस्यपदकापासून सुवर्णपदकापर्यंत त्याने विविध श्रेणींमध्ये अनेक पुरस्कार पटकावले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

आर. माधवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो रॉकेट्री: द नांबी इफेक्टमध्ये दिसणार आहे, जो भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट 1 जुलै 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.