सलमान खानच्या 'या' चित्रपटातून हटवले आतिफ असलमचे गाणे
सलमान खानच्या 'या' चित्रपटातून हटवले आतिफ अस्लमचे गाणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) येथील पुलवामा (Pulwama) दहशतवादी हल्ल्यात सीआरपीफचे 40 जवान शहीद झाले. यामुळे देशभरात सध्या संतापाची लाट उसळली आहे. या परिस्थितीचे पडसाद आता बॉलिवूड मध्ये ही पडले असून पाकिस्तान कलाकारांवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सलमान खान(Salman Khan)च्या या चित्रपटातून पाकिस्तानी गायक आतिफ असलम(Atif Aslam)चे गाणे काढून टाकण्यात आले आहे.

पिंकविलाने (Pinkvilla) याबाबत महिती दिली असून, सलमान खान ह्याने त्याचा चित्रपट 'नोटबुक'(Notebook) मधून आतिफ असलमचे गाणे हटवले आहे. यासाठी आपल्या प्रोक्डशन हाऊसला सलमान खानने आदेश दिले आहेत. तसेच या चित्रपटातील आफित असलमच्या गाण्यावर पुन्हा एकदा नव्याने रेकॉर्डिंग केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.(हेही वाचा-Pulwama Terror Attack: 'अखिल भारतीय सिने कामगार संघटने'कडून पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी)

नोटबुक चित्रपटाचे सलमान खान दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटातून अभिनेता मोहनीश बहल याची मुलगी प्रनूतन आणि जहीर इकबाल यांना लॉन्च करणार आहे. हा चित्रपट येत्या मार्च महिन्यात प्रदर्शित होणार आहे.