बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राला (Priyanka Chopra) आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाअगोदरच आनंदाची बातमी मिळाली आहे. प्रियंकाला 'माराकेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल'ने (Marrakech International Film Festival) सन्मानित करण्यात येणार आहे. प्रियंकाला हा पुरस्कार ऐतिहासिक स्थळ जेमा एल फना स्क्वायरमध्ये दिला जाणार आहे. हा पुरस्कार मिळणारी प्रियंका पहिली भारतीय कलाकार ठरली आहे. प्रियांका व्यतिरिक्त इतर 3 कलाकारांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या तीनही व्यक्तींनी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले आहे. यात अमेरिकन दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड, वेटरन फ्रेंच फिल्ममेकर बरट्रॅन्ड तावेर्निएर आणि मूना फत्तेउ यांचा समावेश आहे. (हेही वाचा - बॉलिवूड अभिनेता मोहनीश बहल याची लेक प्रनूतनचे बोल्ड फोटो व्हायरल)
2018 मध्ये प्रियंकाने अमेरिकन गायक निक जोनस याच्यासोबत विवाह केला होता. 1 डिसेंबर व 2 डिसेंबरला प्रियंकाचा लग्न सोहळा पार पडला होता. प्रियंकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पती निक जोनस याच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला प्रियंकाच्या चाहत्यांनी लाइक तसेच कमेंट्स केल्या आहेत. (हेही वाचा - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोनचे पार्टीवेअर कपडे 2 डिसेंबरला विक्रीसाठी होणार उपलब्ध)
प्रियंका आणि निक या जोडप्याने मागील वर्षी प्रेमविवाह केला होता. या दोघांच्या अंतरात 10 वर्षांचा फरक आहे. परंतु, तरीदेखील त्यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. प्रियांका आणि निक जोनसला सर्वप्रथम 2017 च्या 'मेटगाला' कार्यक्रमात एकत्र पाहिले होते. प्रियंकाने गेल्या आठवड्यात आपला कुत्रा जीनो जोनसचा व्हिडिओ शेअर केला होता.