बॉलिवूड अभिनेता मोहनीश बहल (Mohnish Bahl) याची मुलगी प्रनूतन बहलचे (Pranutan Bahl) साडीमधील बोल्ड फोटो (Bold Photo) व्हायरल झाले आहेत. प्रनूतनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रनूतन खूपच हॉट दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानने (Salman Khan) प्रनूतन बहलला लाँच केले होते. प्रनूतनच्या पहिला डेब्यूला फारस यश आलं नाही. मात्र, आता तिच्या हॉट अंदाजामुळे चाहते घायाळ झाले आहेत. प्रनूतनने फिल्ममेकर सूरज बडजात्या यांचा मुलगा देवांश याच्या लग्नात हजेरी लावली. यावेळी सर्वांच्या नजरा प्रनूतनकडे लागल्या होत्या. (हेही वाचा - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने केली हॉरर थ्रिलर 'दुर्गावती' चित्रपटाची घोषणा)
सलमान खानच्या बॅनरखाली तयार होणार्या आगामी सिनेमामध्ये प्रत्यून मुख्य अभिनेत्रीच्या रूपात झळकणार आहे. प्रनूतन सोबत अभिनेता झहीर इक्बाल महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. प्रनूतन ही दिवंगत अभिनेत्री नूतन यांची नात आहे. त्यामुळे प्रनूतनकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. प्रनूतनच्या नावामध्येच 'नूतन' यांचे नाव आहे. काजोल आणि मोहनीश हे दोघे मावस भाऊ-बहिण आहेत. त्यामुळे प्रनूतनकडे प्रेक्षकांच्या नजार लागल्या आहेत.