प्रभास च्या लग्नाविषयी त्याच्या मावशीने केला खुलासा; पाहा कधी आणि कोणाशी करणार प्रभास लग्न...
Prabhas (Photo Credits: Facebook)

Prabhas' Aunt Reveals The Marriage Plans Of The Actor: बाहुबली चित्रपटांच्या मालिकेच्या अद्भुत यशानंतर प्रभास दक्षिणमधील पॅन इंडिया सुपरस्टार बनला आहे. सर्वात आधी 'साहो'मध्ये दिसलेला प्रभास आपल्या व्यावसायिक आयुष्यात उत्तम कामगिरी करत आहे. त्याच्या आगामी चित्रपटांव्यतिरिक्त प्रभासचे वैयक्तिक जीवनसुद्धा नेहमीच चर्चेचे राहिले आहे. तो सध्या तेलुगु चित्रपटसृष्टीत सर्वाधिक पॉप्युलर स्टार आहे असं म्हणायला हरकत नाही. तसेच त्याचा विवाह आणि लव्ह लाईफबद्दल कायम चर्चा होत असतात. तसेच या सुपरस्टारचं बाहुबली सिनेमातील त्याची सह-अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिच्याशी नेहमीच जोडलं गेलं आहे. पण प्रभासने वारंवार ही बातमी खोटी असल्याचे  सांगितले आहे.

रिपोर्ट्सनुसार, प्रभास आपला आगामी ‘जान’ या चित्रपटानंतर लग्न करण्याचा विचार करत आहे. तेलगू ऑनलाईन न्यूज पोर्टलनुसार प्रभासच्या लग्नाच्या प्लॅन्सविषयी त्याची मावशी श्यामला देवी यांनी भाष्य केले आहे. 2020 मध्ये 'जान' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रभासचं लग्न ठरवण्याची तयारी करत असल्याचे त्यांनी उघड केले. मात्र, वधूविषयी त्यांनी काहीही सांगितलेले नाही. "आम्ही प्रभासच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहोत. त्याच्या लग्नाच्या सततच्या अफवांबद्दल आम्हालाही चांगलेच हसू येते. आमचे एक मोठे कुटुंब आहे आणि आम्ही अशी मुलगी शोधत आहोत जी आमच्याशी मुक्तपणे मिसळेल," श्यामला देवी यांनी एका तेलगू वेबसाइटला सांगितले आहे.

प्रभास ठरला भारतातील सर्वात महागडा अभिनेता; साहो चित्रपटासाठी घेतले तब्बल 100 कोटी मानधन

दरम्यान, त्याच्या लेटेस्ट ‘साहो’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रभासने आपल्या लग्नाच्या अफवांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले होते की, “ही माझी खासगी बाब आहे आणि मला त्याबद्दल काहीही  सांगायचं नाही?”