KGF Chapter 2: प्रसिद्ध अभिनेता यश आणि संजय दत्त यांच्या 'केजीएफ चॅप्टर 2' चित्रपटाचे पोस्टर लाँच; 'या' दिवशी होणार टीझर रिलीज
केजीएफ चॅप्टर 2 पोस्टर (Image Credit: Twitter)

KGF Chapter 2: यश (Yash) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) या प्रसिद्ध अभिनेत्यांचा नवीन सिनेमा 'केजीएफ: चॅप्टर 2' (KGF Chapter 2)चे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. प्रत्येकजण या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे. संजय दत्त पहिल्यांदाच कन्नड चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचा क्लायमॅक्स शूट झाल्यानंतर सेटवरची अनेक छायाचित्रेही समोर आली होती. तर त्याचवेळी संजय दत्तने चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केल्यानंतर तो खूप कंटाळला होता, असं सांगितलं होतं. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी आता चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. ज्यामध्ये अभिनेता यशचा डेडली लूक समोर आला आहे. या पोस्टरद्वारे पहिल्या टीझरची माहिती समोर आली आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्शने ट्विट करून चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. केजीएफ: चॅप्टर 2 या चित्रपटाचा टीझर 8 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.18 मिनिटांनी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. (हेही वाचा - तैमूर अली खान च्या वाढदिवसानिमित्त करीना कपूर ने केली नव्या प्रेग्नेंसी बुक ची घोषणा; Pregnancy Bible लवकरच होणार लॉन्च )

केजीएफ: चॅप्टर 2 या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. आम्हाला एक वर्षाचा उशीर झाला असला तरी आम्ही आणि स्ट्रॉन्ग आणि डेडली पुढे येत आहोत असे त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून म्हटलं आहे. केजीएफ: चॅप्टर 2 चा टीझर 8 जानेवारी रोजी येईल.

दरम्यान, केजीएफ: चॅप्टर 2 या चित्रपटात यश आणि संजय दत्त यांच्यासोबत श्रीनिधी शेट्टीदेखील दिसणार आहेत. ऑगस्टमध्ये 61 वर्षीय संजय दत्तने कर्करोगाशी झुंज देण्यासाठी आपल्या चित्रपटसृष्टीतील कामाला थोड्या काळावधीसाठी ब्रेक दिला होता. मात्र, कर्करोगावर यशस्वी मात केल्यानंतर अभिनेत्याने नोव्हेंबरमध्ये चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले. 'केजीएफ चॅप्टर 2' मध्ये संजय दत्त 'अधीरा' या खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.