सध्या संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र तसेच राज्य सरकारकडून नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन करण्यात येत आहे. अशातचं अनेक दिग्गज तसेच कलाकार घरी राहण्याचा आणि स्वत:ची काळजी घेण्याचा संदेश देत आहेत. बॉलिवुड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून लोकांना कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी घरी राहण्याचा संदेश दिला आहे.
भारतात व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 22 मार्च रोजी म्हणजेच रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्तिक आर्यनने ट्विटरवर दिलेला संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी आपल्या ट्विट हँडलवरून शेअर केला आहे. (हेही वाचा - देशात 271 कोरोनाग्रस्त रुग्ण; इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने जाहीर केली आकडेवारी; 21 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)
The young actors have something to say..
Its time to be 'Zyada Savdhan' and do 'Corona ka Punchnama'! #IndiaFightsCorona https://t.co/drEZc4ySZMhttps://t.co/KbQaDg7a5Nhttps://t.co/1RjvF70jJlhttps://t.co/nwIES94SDD
— Narendra Modi (@narendramodi) March 20, 2020
कार्तिक आर्यनने आपल्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटात सलग 5 मिनिटे एक डायलॉग बोलून दाखवला होता. कार्तिकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने कोरोना संदर्भात लोकांना सलग अडीच मिनिटे संदेश दिला आहे. यात त्याने लोकांनी घरातून बाहेरपडू नये, असं म्हटलं आहे. तसचं शासनाने दिलेल्या सुट्टया काही फिरायला जाण्यासाठीच्या नसून या काळात तुम्ही घरात बसा, असं आवाहनही कार्तिकने केलं आहे. कार्तिकने शेअर केलेला हा व्हिडिओ नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करताना नरेंद्र मोदी यांनी ‘या तरुण कलाकाराला तुम्हाला काही तरी सांगायचे आहे. सध्या जास्त सावध होण्याची गरज आहे असून कोरोनाचा पंचनामा करण्याची गरज आहे, अशी कॅप्शनही मोदींनी दिली आहे.