 
                                                                 लोकसभा निवडणूक 2019 च्या निकालाचा दिवस जसजसा जवळ येतोय, तशीतशी लोकांमध्ये उत्सुकता अधिकच वाढत चाललीय. त्यातच नुकताच समोर आलेला एक्झिट पोल ह्या निकालासाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू बनलाय. त्यातच भर म्हणून आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ह्या बायोपिकचा नवा ट्रेलर यूट्युबवर रिलीज झाला आहे. ह्या चित्रपटात मोदींच्या जीवनातील वेगवेगळे पैलू पाहायला मिळणार आहे. ह्या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदींच्या भूमिकेत दिसणार आहे.
PM Narendra Modi Trailer:
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चित्रपटाचा हा नवा ट्रेलर पाहून विवेक ओबेरॉयने ह्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिलाय असच दिसतय. तसेच ह्या ट्रेलरमध्ये पीएम मोदींचा सन्याशी होण्यापासून ते राजकारणातील प्रवेश हा प्रवास दाखविला आहे. तसेच ह्या ट्रेलर गोध्रा हत्याकांडाची झलक देखील पाहायला मिळते.
ह्या चित्रपटाचा ट्रेलर मागील महिन्यातच प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र ह्या चित्रपटावर काही वाद उफाळून आल्यानंतर निवडणूक आयोगाने ह्यासंबंधी काही सूचना दिल्या. त्यामुळे ट्रेलरमध्ये थोडे फेरफार करुन हा नवीन ट्रेलर प्रदर्शित केला. तसेच लोकसभा निवडणूक 2019 च्या अंतिम टप्प्यातील मतदान होईपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करु नये असेही सांगण्यात आले.]
म्हणूनच फिल्म निर्मात्यांनी हा नवा ट्रेलर ट्विटर आणि यूट्युबवर शेअर केला आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार (Omung Kumar) यांनी केले आहे. येत्या 24 मे ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मुंबई, गुजरात, आणि उत्तराखंड सह इतर अनेक भागात या सिनेमाचे शूटिंग पार पडले आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
