पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) मध्ये प्रचंड बहुमताने विजय झाला. निवडणूक निकालानंतर दुसऱ्याच दिवशी पीएम मोदींचा बायोपिक प्रदर्शित झाल्याने सिनेमाला प्रचंड यश मिळेल, अशी आशा होती. मात्र सिनेमाला अपेक्षित यश मिळाले नाही. 24 मे रोजी प्रदर्शित झालेल्या पीएम नरेंद्र मोदी सिनेमात विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) याने नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे. (युट्यूब वरुन पुन्हा एकदा हटवला 'PM Narendra Modi' चित्रपटाचा ट्रेलर)
या सिनेमाला पूर्वीपासूनच अनेक वादांना सामोरे जावे लागले. अनेक वादांचा सामना करत सिनेमा प्रदर्शित झाला. मात्र सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाल करु शकला नाही. सिनेमा प्रदर्शित होऊन 6 दिवस झाले. तरी देखील सिनेमा आतापर्यंत 20 कोटींची कमाई करु शकलेला नाही.
प्राप्त माहितीनुसार, सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 2.88 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 3.76 कोटी, तिसऱ्या दिवशी 5.12 कोटी, चौथ्या दिवशी 2.41 कोटी, पाचव्या दिवशी 2.02 कोटी तर सहाव्या दिवशी 1.71 कोटींची कमाई केली. एकूण मिळून आतापर्यंत सिनेमाने 17.9 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय प्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे. संदिप सिंग यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून ओमंग कुमार यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.