PM Narendra Modi Biopic (Photo Credits: Twitter & YouTube)

अनेक वादविवादांच्या भोव-यात अडकलेला आणि पुन्हा नव्याने प्रदर्शित झालेला पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ह्या चित्रपटाचा नवा ट्रेलर पुन्हा एकदा यूट्युबवरुन (YouTube) हटवला गेला आहे. येत्या 24 मे ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 20 मे ला ह्या चित्रपटाचे नवीन पोस्टर सुद्धा प्रदर्शित करण्यात आले. त्याचबरोबर नवीन ट्रेलरसुद्धा प्रदर्शित झाला. मात्र काही तासांत हा ट्रेलर पुन्हा युट्यूबवरुन हटविण्यात आला. अद्याप हे ट्रेलर हटविण्यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही.

एकीकडे निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, दुसरीकडे पीएम नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचीही तितकीच हवा आहे.निवडणूकांमुळे ह्या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. मात्र त्याआधी ह्या चित्रपटाचा ट्रेलर युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र काही कारणास्तव निवडणूक आयोगाने हा ट्रेलर युट्यूब वरुन हटविला. निवडणूकीमुळे 'तारीख पे तारीख' पडत हा सिनेमा अखेर 24 मे ला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आधीच्या ट्रेलर मधील काही आक्षेपानंतर नव्याने ह्या चित्रपटाचा ट्रेलर 20 मे ला रिलीज करण्यात आला. मात्र काही कारणास्तव पुन्हा एकदा हा ट्रेलर युट्यूबवरुन हटवलाय. गुगल वर सर्च करुन सुद्धा हा व्हिडियो मिळत नाहीय.

PM Narendra Modi Biopic: नागपूर येथे नितीन गडकरी आणि विवेक ओबेरॉय यांच्या हस्ते पी.एम. नरेंद्र मोदी चित्रपटाच्या नव्या पोस्टरचे अनावरण

पीएम नरेंद्र मोदी ह्या चित्रपटात विवेक ओबेरॉय(Vivek Oberoi) सह बोमन इराणी(Boman Irani), मनोज जोशी(Manoj Joshi), जरीना वहाब, दर्शन कुमार आणि बरखा बिष्ट हे कलाकारही दिसतील. उमंग कुमार दिग्दर्शित ह्या फिल्मची निर्मिती संदीप सिंह, आनंद पंडित आणि सुरेश ओबेरॉय यांनी मिळून केली आहे. उमंग कुमार ने याआधी 'सरबजीत' आणि 'मेरीकॉम' यांसारखे बायोपिक केले आहेत.