Pathaan Creates History: शाहरुख खानच्या 'पठाण'ने रचला इतिहास; Bahubali 2 ला मागे टाकून ठरला सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट
Pathaan Poster (PC - Instagram)

बॉलिवूडचा मेगा सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन केले आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'पठाण'ने आपल्या दमदार कमाईने सर्वांना प्रभावित केले आहे. आता 'पठाण'ने नवा इतिहास रचला आहे. बातमी आहे की, शाहरुख खान स्टारर 'पठाण' ने कमाईच्या बाबतीत साउथ सिनेमाचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'बाहुबली 2'ला मागे टाकण्याचा विक्रम केला आहे.

प्रसिद्ध विश्लेषक तरण आदर्श यांनी शाहरुख खान स्टारर 'पठाण' या चित्रपटाच्या कमाईच्या ताज्या आकडेवारीबद्दल माहिती दिली आहे. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नवीनतम पोस्ट शेअर करून तरणने सांगितले की, 'पठाण' चित्रपटाने रिलीजच्या 25 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर हिंदीमध्ये 3.25 कोटी आणि इतर भाषांमध्ये 7 लाखांचा व्यवसाय केला आहे.

अशाप्रकारे 'पठाण'ने सर्व भाषांमध्ये बॉक्स ऑफिसवर 511.42 कोटींचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन केला आहे. यासोबतच 'पठाण'ने साऊथचा सुपरस्टार प्रभास स्टारर चित्रपट 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडला आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, बाहुबली 2 ने बॉक्स ऑफिसवर 510.99 कोटी कमावले होते. त्यामुळे आता 'पठाण' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पठाण या चित्रपटाने 24 दिवसांत जगभरात 981 कोटींची कमाई केली आहे.

केवळ 'बाहुबली 2' च नाही तर सुपरस्टार शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने त्याच्या चमकदार अभिनयाच्या जोरावर दक्षिण चित्रपटसृष्टीतील ब्लॉकबस्टर चित्रपट KGF Chapter 2, RRR, टायगर जिंदा है, दंगल आणि इतर अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. यासह, पठाण हा बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. (हेही वाचा: Shah Rukh Khan ने Virat Kohli आणि Ravindra Jadeja च्या 'Pathaan' व्हायरल डान्स व्हिडिओवर दिली प्रतिक्रिया, म्हणाला....)

दरम्यान, कार्तिक आर्यनचा शहजादा आणि हॉलिवूड चित्रपट 'अँट-मॅन अँड द वास्प: क्वांटुमनिया' शुक्रवारी सिनेमागृहात प्रदर्शित झाले. या चित्रपटांमुळे पठानवर काही प्रमाणात परिणाम झाला. अशा परिस्थितीत प्रथम यशराज फिल्म्सने शुक्रवारी चित्रपटाची तिकिटे केवळ 110 रुपये ठेवली, तर वीकेंडला त्याची किंमत केवळ 200 रुपये आहे.