Parth Samthaan Bollywood Debut: आलिया भट्टसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार टीव्ही अभिनेता पार्थ समथान; यावर्षी सुरु होणार चित्रपटाचे शुटींग
Parth Samthaan आणि Alia Bhatt (संग्रहित संपादित प्रतिमा)

टीव्हीवरील सुपरहिट शो 'कसौटी जिंदगी की सीझन 2' मध्ये आपल्या शानदार अभिनयाने लोकांची मने जिंकणारा पार्थ समथान (Parth Samthaan) लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. नुकत्याच एका न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार पार्थ लवकरच आलिया भट्ट (Alia Bhatt) स्टारर चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता एका मुलाखतीत पार्थने या बातमीवर शिक्कामोर्तब केले आहे. लवकरच तो आलियाबरोबर एक चित्रपट करणार आहे आणि या चित्रपटाचे शूटिंग याच वर्षापासून सुरू होणार असल्याचे त्याने सांगितले. चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शनचे काम सध्या सुरू आहे.

याआधी संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात पार्थ आलिया भट्ट सोबत काम करणार असल्याची चर्चा होती, परंतु याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. दुसरीकडे पार्थने रेसुल पुकुट्टीचा 'पिहरवा' चित्रपट साईन केला आहे, ज्यामध्ये आलिया देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट भारत-चीन युद्धाच्या वेळी शहीद झालेल्या बाबा हरभजन सिंग यांच्या कथेवर आधारित असेल.

'कैसी ये यारियां' मध्ये माणिकची आणि 'कसौटी जिन्दगी की 2' मध्ये अनुरागची भूमिका साकारणाऱ्या पार्थला अल्पावधीतच प्रसिद्धी मिळाली होती. नुकतेच त्याने पुन्हा मालिका करणार नसल्याचे सांगितले होते. आता ओटीटी व्यासपीठावर पार्थची नवी सिरीज रिलीज होणार आहे. त्यातच त्याच्या बॉलिवूड डेब्यूची बातमी आली आहे. या चित्रपटासाठी आपण खूप उत्साही असल्याचे त्याने सांगितले आहे. एक आऊटसाईडर म्हणून हा चित्रपट आपल्यासाठी एक मोठी संधी असल्याचे तो सांगतो. (हेही वाचा: Dostana 2 मधून कार्तिक आर्यन ला डच्चू दिल्यानंतर दिग्दर्शक करण जौहरने आता इन्स्टाग्रामवरही अभिनेत्याला केले अनफॉलो)

दरम्यान, पार्थची ‘मैं हीरो बोल रहा हूं' नावाची वेब सिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिरीजची निर्मिती एकता कपूरने केली आहे. टीझरमध्ये पार्थ एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्या चाहत्यांना हा त्याचा नवा अवतार प्रचंड आवडलेला दिसून येत आहे.