गझल सम्राट म्हणून लोकप्रिय असणाऱ्या पंकज उधास यांना अखेरचा निरोप (Pankaj Udhas Funeral News) देण्यात आला आहे. काल त्यांचे दुर्धर आजारानं निधन झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव निवासस्थानी ठेवण्यात आले होते. यानंतर मुंबईतील वरळीमधील हिंदू वैकुंठभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर हजर असल्याचे दिसून आले. (हेही वाचा - Pankaj Udhas Dies: प्रसिद्ध गझल गायक पद्मश्री विजेते पंकज उदास यांचे निधन)
पाहा पोस्ट -
#देखें_वीडियो | गजल गायक पंकज उधास का पार्थिव शरीर अंतिम संस्कार के लिए मुंबई स्थित उनके आवास से ले जाया जा रहा#PankajUdhas#mediaindia .live#PankajUdhasDeath#PankajUdhasFuneral pic.twitter.com/X022R7Lk0b
— media india (@mediaindialive) February 27, 2024
वयाच्या 72 व्या वर्षी पंकज उधास यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही महिन्यांपासून पॅनक्रियाच्या कॅन्सरनं पीडीत होते असे त्यांचे मित्र गायक जलोटा यांनी सांगितले. पंकज उधास यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी हजर होते. यात प्रख्यात गायक सोनू निगम, अनुप जलोटा यांच्या नावाचा समावेश आहे.
पंकजजींच्या निधनानंतर संपूर्ण बॉलीवूड विश्वाला मोठा हादरा बसला आहे. त्यांचे निधन होताच अनेक सेलिब्रेटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. काल सकाळी अकराच्या सुमारास त्यांचे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या मुलीनं सोशल मीडियावर याबाबत माहिती देणारी पोस्ट व्हायरल केली होती.