Panipat Sanjay Dutt and Kriti Sanon Look: 'पानिपत' मधील संजय दत्त आणि कृती सेनन यांच्या ऐतिहासिक भुमिकेतील पहिली झलक
Panipat Sanjay Dutt and Kriti Sanon Look Out (Photo Credits-Instagram/Twitter)

बॉलिवूड मधील ऐतिहासिक विषयाचे कथन करणारा आगामी चित्रपट 'पानिपत' (Panipat) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटातील अभिनेता संजय दत्त (sanjay Dutt) याने त्याचा वॉरियर लूक झळकवला आहे. वॉरियर लूक मध्ये संजय दत्त एका लढवैय्याच्या रुपात दिसून येत आहे. चित्रपटात संजय दत्त अफगाणिस्तानच्या सुल्तानाची भुमिका साकारणार असून त्यामध्ये त्याचे नाव अहमद शाह अब्दाली असे देण्यात आले आहे. पोस्टर प्रदर्शित केल्यानंतर येत्या मंगळवारी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याची सांगितले आहे.

संजय दत्त याचा वॉरियर लूक पाहून त्याची मुलगी त्रिशाला हिने इन्स्टाग्रामवर कमेंट केली आहे. त्यामध्ये तिने प्रेमात्मक कमेंट करत तुम्ही शानदार दिसत असल्याची तारीफ केली आहे.

तसेच कृती सेनन सुद्धा या चित्रपटात मुख्य भुमिकेतून झळकणार आहे. त्यामध्ये कृती पार्वती बाई यांची भुमिका साकारताना दिसून येणार आहे. अर्जून कपूर याने ट्वीट करत असे म्हटले आहे की, A True Queenns Needs No Crown. पानिपत मध्ये अर्जुन कपूर आणि जीनत अमान सुद्धा मुख्य भुमिकेतून दिसून येणार आहे.(भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धाची गाथा सांगणाऱ्या Panipat चं Poster झालं प्रदर्शित)

या चित्रपटाची कथा पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर आधारित आहे. जी 14 जानेवारी 1761 मध्ये मराठा आणि अफगाणिस्तानचा सुल्तान अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये पानिपत येथे युद्ध झाले. तर अर्जुन कपूर या चित्रपटात सदाशिव भाऊ यांची भुमिका साकारणार आहे. जे पेशवा बाजीराव यांचे प्रथम भाचा आणि मराठा सेनेचे कमांडर-इन-चीफ होते. जीनत अमान सकीना बाई यांची भुमिका साकारणार आहे.