कोरोना विषाणू महामारीमुळे ओटीटी (OTT) व्यासपीठाची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. अशात प्रत्येक महिन्यात लोकांना ओटीटी वर प्रदर्शित होणारे नवीन चित्रपट आणि सिरीजबाबत उत्सुकता असते. 2022 चा दुसरा महिना म्हणजेच फेब्रुवारी सुरू झाला असून, या महिन्यातही अनेक चित्रपट आणि मालिका प्रदर्शित होणार आहेत. हे सर्व चित्रपट आणि मालिका वेगवेगळ्या विषयांवर आहेत, त्यामुळे या महिन्यात प्रेक्षकांना उत्तम कलाकृतींची मेजवानी मिळणार आहे. या यादीत दीपिका पदुकोणचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'गेहराईं'पासून ते माधुरी दीक्षितच्या 'द फेम गेम' या मालिकेचा समावेश आहे.
लूप लपेटा-
तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन यांचा ‘लूप लपेटा’ चित्रपट या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. हा एक कॉमेडी थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट 4 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
रॉकेट बॉयज-
‘रॉकेट बॉईज’ हा चित्रपट डॉ. होमी भाभा आणि डॉ विक्रम साराभाई यांच्यावर आधारित आहे. हे दोघे कसे भेटले आणि नंतर त्याच्यात कशी मैत्री होते हे दाखवण्यात आले आहे. यानंतर दोघेही भारताला आण्विक महासत्ता बनण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यासाठी मार्गदर्शन करतात. हा चित्रपट 4 फेब्रुवारी रोजी Sony LIV वर प्रदर्शित होईल.
द ग्रेट इंडियन मर्डर-
‘द ग्रेट इंडियन मर्डर’ ही तिग्मांशू धुलिया दिग्दर्शि क्राइम मिस्ट्री ड्रामा वेब सिरीज आहे. या सिरीजमध्ये रिचा चढ्ढा, प्रतीक गांधी, आशुतोष राणा आणि शरीब हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत. ही सिरीज डिस्ने प्लस हॉटस्टारवर 4 फेब्रुवारीपासून पाहता येतील.
गहराइयां-
दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य यांच्या गहराइयां या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. शकुन बत्रा दिग्दर्शित हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर 11 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
द फेम गेम-
माधुरी दीक्षित ‘द फेम गेम’द्वारे डिजिटल पदार्पण करत आहे. या सिरीजच्या माध्यमातून एका सुपरस्टारच्या आयुष्याची झलक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सिरीजचे नाव आधी ‘फाइंडिंग अनामिका’ असे होते, परंतु अलीकडेच त्याचे नाव ‘द फेम गेम’ ठेवण्यात आले. ही सिरीज 25 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. (हेही वाचा: Highest-Paid TV Actress: रुपाली गांगुली ठरली सर्वाधिक मानधन घेणारी टीव्ही अभिनेत्री; Anupamaa साठी घेत आहे 3 लाख प्रति एपिसोड- Report)
लव्ह हॉस्टल-
अभिनयासोबतच शाहरुख खानने चित्रपट निर्मितीतही पाय रोवले आहेत. रेड चिलीज एंटरटेनमेंट या बॅनरखाली त्याने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता त्याच्या निर्मितीमधील 'लव्ह हॉस्टेल' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. यामध्ये विक्रांत मॅसी, सान्या मल्होत्रा आण बॉबी देओलसारखे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट थेट ZEE5 या डिजिटल प्लॅटफॉर्मवर 18 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.