Highest-Paid TV Actress: रुपाली गांगुली ठरली सर्वाधिक मानधन घेणारी टीव्ही अभिनेत्री; Anupamaa साठी घेत आहे 3 लाख प्रति एपिसोड- Report
जेव्हा ही मालिका यशाच्या शिखरावर पोहोचली आहे, तेव्हा रुपालीने आपले मानधन वाढवले आहे. अहवालानुसार रुपाली आता एका एपिसोडसाठी 3 लाख रुपये घेत आहे. अशाप्रकारे ती भारतीय टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे
राजन शाही यांची कौटुंबिक मालिका 'अनुपमा'ने (Anupamaa) अगदी पहिल्या भागापासून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या शोचे जगभरात चाहते असून अनेकदा सोशल मीडियावरही या मालिकेबाबत चर्चा रंगत असते. शोच्या माध्यमातून अशी कथा प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहे, ज्याच्याशी प्रेक्षक स्वत:ला रिलेट करू शकतात. या शोची मुख्य अभिनेत्री अनुपमा म्हणजेच रुपाली गांगुलीच्या (Rupali Ganguly) लोकप्रियतेमध्येही मोठी वाढ झाली आहे. रुपाली गांगुलीच्या 'अनुपमा'मधील अभिनयाचे सर्वजण कौतुक करत आहेत.
रुपाली तिच्या दमदार अभिनयामुळे टीव्ही जगतातील टॉप स्टार्सपैकी एक बनली आहे. महत्वाचे म्हणजे मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुपाली गांगुली आता भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. रिपोर्टमध्ये सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, रुपाली गांगुलीने दिवसाला 1.5 लाख रुपये फी घेऊन या मालिकेची सुरुवात केली. ही सर्वोच्च श्रेणी आहे, परंतु ती एक ज्येष्ठ अभिनेत्री देखील आहे, त्यामुळे निर्मात्यांनी तितके मानधन देण्यास तयारी दर्शवली.
परंतु आता जेव्हा ही मालिका यशाच्या शिखरावर पोहोचली आहे, तेव्हा रुपालीने आपले मानधन वाढवले आहे. अहवालानुसार रुपाली आता एका एपिसोडसाठी 3 लाख रुपये घेत आहे. अशाप्रकारे ती भारतीय टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. एवढेच नाही तर रुपालीने टीव्हीवरील राम कपूर, रोनित रॉय अशा बड्या स्टार्सनाही मागे टाकले आहे. (हेही वाचा: Shweta Tiwari Official Statement: श्वेता तिवारीला समजली तिची चूक, केलेल्या वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण)
रुपाली गांगुली व्यतिरिक्त निधी शाह, पारस कलनावट आणि अनेरी वजानी, सुधांशू पांडे, मदालसा शर्मा, गौरव खन्ना या शोमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. सुधांशू पांडे आणि गौरव खन्ना यांना प्रति एपिसोड दीड लाख रुपये मिळतात. 'अनुपमा'पूर्वी रुपाली गांगुलीला 'साराभाई व्हर्सेस साराभाई' या शोमधील मोनिषाच्या भुमिकेमूळे लोकप्रियता मिळाली होती. मात्र, 'अनुपमा'ने तिला अधिक उंची गाठण्यास मदत केली.
(The above story first appeared on LatestLY on Feb 01, 2022 06:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

