 
                                                                 बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) याने आतापर्यंत अनेक स्थलांतरित मजूरांना त्यांच्या गावी पोहोचविले आहे. सोनू सूदच्या या महान कार्यामुळे अनेक मजूरांसाठी तो देवदूत बनला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात अडकलेल्या अनेक कामगारांना सोनुने स्वखर्चातून त्यांच्या मूळगावी परत पाठवले आहे. या कामगारांना प्रवास करण्यासाठी विविध बसेसची व्यवस्था त्याने केली आहे. सोनूच्या या सामाजिक कार्याचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे. तसेच अनेक राजकारण्यांपासून खुद्द राज्यपालांनी याची दखल घेतली आहे. त्यामुळे याच संधीचा फायदा एका छोट्याशा चिमुरडीने सोनू सूद कडे केविलवाणी विनंत केली आहे.
या मुलीने आपल्या वडिलांच्या वतीने सोनूकडे आपल्या घरातील एका व्यक्तीला तिच्या घरी पाठवा असे सांगितले. सोनू सूद ने सांगितली कामगारांना घरी पाठवण्याच्या कामातील खर्चाची रक्कम; एका बस साठी लागतात 'इतके' लाख
पाहा हा क्युट व्हिडिओ:
View this post on Instagram
Meanwhile #sonusood is getting a lot of requests 😜😋 . . 🎥 @soni.piya #viralbhayani @viralbhayani
ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून तिची आई आहे. हा संदेश या चिमुकलीने तिच्या बाबांच्या वतीने केला आहे. या व्हिडिओ पाहून कुणालाही आपले हसू आवरणार नाही.
दरम्यान, सोनुने यापुर्वी सुद्धा रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणा वैद्यकीय कर्मचार्यांसाठी मुंबई मधील आपले हॉटेल दान केले होते तसेच वेगवेगळ्या कोरोनाव्हायरस मदत निधीसाठी सुद्धा दान केले होते,त्यानंतर मागील कित्येक दिवसांपासुन तो मजुरांसाठी हे काम करत आहे. त्याच्या या कार्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
