Raha Kapoor Face Revealed in New Photos: रणबीर कपूर-आलिया भट्टने ख्रिसमसनिमित्त चाहत्यांना दिली खास भेट; पहिल्यांदा दाखवला मुलगी राहाचा चेहरा, Watch Video
Alia Bhatt, Ranbir Kapoor And daughter Raha (PC-Yogen Shah)

Raha Kapoor Face Revealed in New Photos: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) हे बॉलिवूडचे दोन मोठे स्टार्स आहेत. जेव्हापासून त्यांची मुलगी राहाचा जन्म झाला तेव्हापासून हे जोडपे मीडियापासून मुलीचा चेहरा लपवण्यात यशस्वी झाले आहे. तथापि, ख्रिसमसच्या दिवशी त्यांनी त्यांच्या चाहत्यांना एक खास भेट दिली. या जोडप्याने प्रथमच त्यांच्या मुली राहा (Raha Kapoor) हिचा गोंडस चेहरा चाहत्यांना दाखवला. आज ख्रिसमसच्या खास मुहूर्तावर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी मुलीसह पापाराझींना पोझ दिली.

रणबीरने राहाला उचलून घेतले होते. तसेच आलिया त्याच्यासोबत तिच्या मुलीची काळजी घेताना दिसली. यादरम्यान रणबीरने जॅकेटसह पॅन्ट घातलेली दिसली आणि आलियाने फ्लोरल मिनी गाऊन घातला होता. या जोडप्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव करून प्रतिक्रिया दिल्या आहेत. (हेही वाचा -Merry Christmas 2023: आलिया भट्टने ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचे सुंदर फोटो केले शेअर, रणबीर कपूर आणि कुटुंबासह खास दिवस केला साजरा)

पहा व्हिडिओ - 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले की, 'ती खूप क्यूट दिसत आहे.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'राहा हुबेहुब तिचे आजोबा ऋषी कपूर यांच्यासारखी दिसते.' एकाने लिहिले की, 'राहा तिच्या पालकांपेक्षा सुंदर दिसत आहे.' तथापि, बहुतेक वापरकर्त्यांनी राहा दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासारखे दिसत असल्याच म्हटलं आहे.