Virushka Wedding Anniversary: अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी ' खास' फोटो शेअर करत दिल्या एकमेकांना  लग्नाच्या दुसर्‍या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Virat Kohli and Anushka Sharma (Photo Credits: Instagram)

Virushka 2nd Wedding Anniversary:  भारतीय क्रिकेट संघाचा रनमशीन अशी ओळख असलेला विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) 2017 साली विवाहबंधनात अडकले. आज त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्त विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या लग्न सोहळ्यातील खास फोटो सोशल मीडियामध्ये शेअर करत एकमेकांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहे. अनुष्का आणि विराट इटलीमध्ये विवाहबंधनात अडकले होते. त्यांनी लग्नाची बातमी मीडियापासून लपवत गुपचूप विवाह केला होता. विवाहबंधनात अडकल्यानंतर त्यांनी सोशल मीडियात अधिकृत घोषणा केल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. अनुष्का शर्मा चा Kiss Of Love, DDCA च्या कार्यक्रमादरम्यान विराट कोहली याच्या हातावर किस करताना दिसली बॉलीवूडची परी, पहा व्हिडिओ

अनुष्का शर्मा ची पोस्ट

विराट कोहलीची पोस्ट

विराट आणि अनुष्का त्यांच्या खाजगी आयुष्याबददल फार गोष्टी मीडिया किंवा चाहत्यांसोबत आणत नाहीत. मात्र त्यांच्या अनेक लहानसहान गोष्टींमधून त्यांच्या चाहत्यांना कपलगोल्स मिळतात. त्यामुळे त्यांचा खास चाहतावर्गदेखील आहे.