Sacred Games 2 (File Image)

क्राईम-थ्रिलर 'सेक्रेड गेम्स'च्या (Sacred Games) दोन सीझनने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे व आता चाहते त्याच्या तिसऱ्या सीझनची (Sacred Games 3) वाट पाहत आहे. शोच्या चाहत्यांना गणेश गायतोंडे (नवाजुद्दीन सिद्दीकी) आणि सरताज सिंग (सैफ अली खान) यांना एकत्र पडद्यावर पाहायचे आहे आणि लवकरच तिसरा सीझन येईल अशी आशाही व्यक्त केली जात आहे. आता दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) याबाबत एक महत्वाची माहिती दिली आहे, ज्यामुळे तिसऱ्या सीझनची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांची निराशा होऊ शकते. अनुराग कश्यपने रविवारी सेक्रेड गेम्सच्या पुढील सीझनच्या फेक कास्टिंग कॉलबद्दल खुलासा केला.

अनुराग कश्यपने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे आणि त्याला एक मोठा घोटाळा असल्याचे म्हटले आहे. तसेच आपल्या फॉलोअर्सना त्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार करण्यास सांगितले आहे. अनुरागने लिहिले- ‘हा माणूस राजबीर_कास्टिंग घोटाळा आहे. कृपया त्याविरुद्ध तक्रार करा. सेक्रेड गेम्सचा सीझन 3 येत नाही. मी या व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवत आहे.’ एका व्यक्तीने सेक्रेड गेम्स सीझन 3 साठी चार महिला आणि एका पुरुषाचे कास्टिंग सुरु झाले असल्याचे सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

आपल्या पोस्टमध्ये त्याने पात्रांची वये आणि अपेक्षाही लिहिल्या आहेत. मात्र अशा प्रकारचे कोणतेही कास्टिंग होत नसल्याचे अनुराग कश्यपने सांगितले आहे. तसेच सेक्रेड गेम्स 3 होत नसल्याची माहितीही दिली आहे. सेक्रेड गेम्स ही अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि नीरज घायवान यांनी दिग्दर्शित केलेली क्राईम थ्रिलर मालिका आहे. (हेही वाचा: ज्येष्ठ अभिनेते Vikram Gokhale यांचा नवा चित्रपट; स्वतः केले लेखन, संपादन, संगीत आणि दिग्दर्शन, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीचा समावेश)

दरम्यान, या सिरीजमध्ये सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे, गिरीश कुलकर्णी, नीरज काबी, कल्की कोचलिन, रणवीर शौरी, पंकज त्रिपाठी आणि अमृता सुभाष यांनी भूमिका केल्या होत्या. सेक्रेड गेम्सचा पहिला सीझन जुलै 2018 मध्ये 8 भागांसह आला होता. त्याचा दुसरा सीझन ऑगस्ट 2019 मध्ये आला होता. चाहते त्याच्या तिसऱ्या सीझनची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत.