ज्येष्ठ अभिनेते Vikram Gokhale यांचा नवा चित्रपट; स्वतः केले लेखन, संपादन, संगीत आणि दिग्दर्शन, ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीचा समावेश
रुपाली सुरीबद्दल विक्रम गोखले सांगतात. ‘रुपाली ही खूप चांगली अभिनेत्री आहे. ती एक चांगली विद्यार्थिनी आहे. ती गोष्टी खूप जवळून ऐकते आणि समजून घेते. तिला योग्य दिशा मिळाली तर ती भविष्यात चमत्कार घडवेल.’
मायानगरीत असे म्हटले जाते की, कारकिर्दीची सुरुवात चांगली असेल तर प्रवासाचे मार्गही सुकर होतात आणि प्रवास रंजक असेल तर रस्तेही सहज कापता येतात. अभिनेत्री रुपाली सुरीच्या बाबतीतही असेच काही घडत आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला रुपालीने अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांच्यासोबत 'डॅड होल्ड माय हँड' या आंतरराष्ट्रीय फीचर फिल्ममध्ये काम करून लोकप्रियता मिळवली. आता ती ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांच्या दिग्दर्शनाखाली 'कुछ सीखे' या शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे.
लॉकडाऊनमधील पती-पत्नीच्या नात्यावर विक्रम गोखले यांनी स्वत: या लघुपटाचे लेखन, संपादन, संगीत आणि दिग्दर्शन केले आहे. लॉकडाऊनमुळे जग घरात कैद झाले होते. काही ठिकाणी नाती घट्ट होत होती तर काही ठिकाणी नात्यांमध्ये कटुता आली होती. आता पती-पत्नीमधील हेच आंबट-गोड नाते विक्रमजींनी कॅमेऱ्यात अतिशय सुंदरपणे चित्रित केले आहे.
या कथेबद्दल विक्रम गोखले म्हणतात, ‘जिथे एक स्त्री घरातील स्वयंपाकघर सांभाळते आणि पुरुष बाहेरची कामे करतो. पण लॉकडाऊन दरम्यान पुरुषसुद्धा स्वयंपाकघराच्या कामात मदत करत होते. घरात बसून रोजची कामे करून त्यांनाही कंटाळा येऊ लागला होता, अशा परिस्थितीत पुरुष मंडळींच्या हे लक्षात आले की, भांडी धुणे, जेवण बनवणे अशा घरच्या कामातही मेहनत आहे. जे दिसते तितके सोपे नाही.’ (हेही वाचा: Diba Movie Teaser: नेते दि बा पाटील यांचा जीवन प्रवास येणार रूपेरी पडद्यावर)
ते पुढे म्हणतात, ‘इथे पुरुषांना काही दिवस घरात बसून स्वयंपाकघर आणि घरातील कामे सांभाळता येत नाहीत, तिथे बायका सर्वस्वाचा त्याग करून घर उभे करण्यासाठी आणि ते सांभाळण्यासाठी पूर्ण वेळ देतात. अशाप्रकारे पती-पत्नीमधील नात्यांचे अनेक पदर उलगडणारा 'कुछ सीखें' हा चित्रपट पुरुषांनी महिलांचे समर्पण आणि त्याग अनुभवला पाहिजे याबाबत सामाजिक संदेश देतो.’
अभिनेत्री रुपाली सुरी विक्रम गोखले यांच्या या चित्रपटात काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. रूपालीने विक्रम गोखले यांच्यासोबत 'ऑरगॅनिक दोस्ती' हा आणखी एक चित्रपट केला आहे, जो एक तरुणी आणि वृद्ध व्यक्तीमधील निखळ मैत्री दर्शवतो. या चित्रपटात विक्रम गोखले यांनीही काम केले होते. विक्रम गोखले यांच्याबद्दल रुपाली म्हणते, ‘विक्रम सर हे स्वतःमध्येच अभिनयाची एक संस्था आहे, मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळत आहे, ते मला रागावतात कारण ते माझ्या भल्यासाठी असते. ते अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत जे कलेची खोली समजतात आणि त्यानुसार अभिनय करतात. त्यांच्यासोबत राहिल्याने माझ्या अभिनयाचे आधारस्तंभ मजबूत झाले आहेत.’
रुपाली सुरीबद्दल विक्रम गोखले सांगतात. ‘रुपाली ही खूप चांगली अभिनेत्री आहे. ती एक चांगली विद्यार्थिनी आहे. ती गोष्टी खूप जवळून ऐकते आणि समजून घेते. तिला योग्य दिशा मिळाली तर ती भविष्यात चमत्कार घडवेल.’ दुसरीकडे विक्रम गोखले एक वेब सीरिज लिहित आहेत ज्यामध्ये रुपाली दिसणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 16, 2022 08:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

