ज्येष्ठ अभिनेत्री Tabassum यांच्या निधनाची बातमी खोटी; अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
Tabassum (PC - Instagram)

ज्येष्ठ अभिनेत्री आणि अँकर तबस्सुम (Tabassum) यांच्या निधनाची बातमी सध्या सोशल मीडियावर पसरत आहे. मात्र, ही बातमी व्हायरल होताचं तबस्सुमने स्वत: ट्विटरवर आपली प्रकृती चांगली असून निधनाची बातमी बनावट असल्याचं सांगितलं आहे.

तबस्सुमने ट्विटवर त्यांच्या निधनाची बनावट बातमी पाहून ट्विट केलं असून यात त्यांनी लिहिलं आहे की, 'तुमच्या शुभेच्छामुळे माझी प्रकृती तंदुरुस्त आहे आणि मी माझ्या कुटुंबासमवेत आहे. माझ्याविषयी सोशल मीडियावर पसरलेल्या अफवा पूर्णपणे चुकीच्या आहेत. तुम्ही तुमच्या घरात सुरक्षित रहा, अशीचं मी प्रार्थना करते.' आपल्या पोस्टसमवेत तबस्सुमने त्यांच्या निधनाच्या बनावट पोस्टचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. (वाचा - काँग्रेस नेते Shashi Tharoor यांनी ट्विटरवर केली मोठी चूक; रुग्णालयात भरती Sumitra Mahajan यांना वाहिली श्रद्धांजली)

दरम्यान, तबस्सुमने काही दिवसांपूर्वी कोविडवर मात केली होती आणि त्या दवाखान्यातून घरी आल्या होत्या. याबाबत तबस्सुम यांचा मुलगा होशांग गोविल यांनी यासंदर्भात पीटीआयशी संवाद साधला होता. होशांगने 76 वर्षीय तबस्सुमचा फोटो शेअर केला आणि म्हटलं आहे की, 'चाहत्यांच्या प्रेम व प्रार्थनेमुळे तबस्सुम यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आली आहे आणि त्या घरी परतल्या आहेत. तबस्सुमने कोरोनाला पराभूत केलं असून त्या एका योद्धाप्रमाणे परत आल्या आहेत. देव महान आहे.'