पूनम पांडेला अटक झाल्याचे वृत्त खोटे; स्वतः व्हिडिओ शेअर करत, आपण घरीच सुरक्षित असल्याची दिली माहिती (Watch Video)
Poonam Pandey (Photo Credits: Insta)

सोशल मिडियावर आपले हॉट, सेक्सी फोटोज आणि व्हिडिओजमुळे नेहमीच चर्चेत असणारी पूनम पांडे (Poonam Pandey) आज सकाळपासून एका वेगळ्याच प्रकरणाबाबत चर्चेत होती. लॉक डाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पूनम पांडेला मुंबई पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त व्हायरल झाल्याने, तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र आता स्वतः पूनम पांडेने एक व्हिडिओ शेअर करत हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले आहे. आपण घरीच आहोत व सुरक्षित आहोत अशी माहिती तिने दिली आहे. या व्हिडिओनंतर तिच्या अनेक चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

पूनम पांडे इंस्टाग्राम व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

Guys I heard I got arrested, While I was having a movie marathon last night.

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

आज सकाळी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी रात्री म्हणजेच 10 मे पूनम पांडेला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. पूनम पांडे विनाकारण आपली BMW कार घेऊन रस्त्यावर फिरताना दिसली, त्यामुळे पूनम आणि तिच्या सोबत असलेल्या एक साथीदाराविरुद्ध मुंबईच्या मरीन लाईन्स पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इतकेच नाही तर तिची BMW गाडी देखील जप्त करण्यात आली आहे. तिच्या गैरवर्तणुकीमुळे पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचे म्हटले होते.

(हेही वाचा: लॉकडाऊन चे नियम तोडल्यामुळे हॉट मॉडेल पूनम पांडे ला अटक, BMW कारही झाली जप्त)

त्यानंतर आता पूनम पांडेने आपल्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून, काल रात्री आपण आपल्या घरीच होतो व बॅक टू बॅक 3 चित्रपट पहिले असल्याचे तिने सांगितले आहे. तसेच आपण सुरक्षित असल्याची माहितीही तिने तिच्या चाहत्यांना दिली आहे. अशा प्रकारे पूनम पांडेला अटक झाल्याचे वृत्त पूर्णतः खोटे असल्याचे समोर आले आहे.