नवदाम्पत्य रणवीर सिंग, दीपिका पदुकोण यांचे  मुंबईत आगमन; गृहप्रवेशाचा सोहळाही आजच (व्हिडिओ)
नवदाम्पत्य दीपवीर | (Photo Credit-ANI)

जोडपं एकच पण लग्नं दोन. अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाचे हे वैशिष्ट्य. दोघांनी इटली येथील कोमो येथे लग्नाचा बार दणक्यात उडवला. विदेशात लग्न केलेलं हे बॉलिवूड कपल आता मुंबई आलं आहे. मुंबई विमानतळावर नवदाम्पत्याचे आगमन झाले. हे जोडपं आज मुंबईत गृहप्रवेश करत आहे. त्यांना पाहण्यासाठी दोघांच्याही चाहत्यांनी विमानतळावर गर्दी केली होती.

रणबीर आणि दीपिकाच्या चाहत्यांनी दोघांना मिळून 'दीपवीर' असे नाव दिले आहे. नवदाम्पत्याच्या स्वागतासाठी दीपिकाच्या घरच्या मंडळींनी स्वागताची जोरदार तयारी केली आहे. हे नवदाम्पत्य वरळीतील आपल्या नव्या घरी स्थलांतरीत होणार असल्याचे वृत्त आहे. इटली येथील कोमोच्या किनारी असलेल्या 'विला डेल बालबिअॅनेलो' (Villa Del Balbianello)येथे विवाह केला. हे ठिकाण अतिशय निसर्गरम्य म्हणून ओळखले जाते. (हेही वाचा, दीपिकाच्या स्वागतासाठी असे सजले रणवीर सिंगचे घर (Video))

'दीपवीर' या दाम्पत्याने 14 आणि 15 नोव्हेंबरला अनुक्रमे कोंकणी आणि सिंधी पद्धतीने विवाह केला. या सोहळ्यास मोजके असे केवळ 40 लोकच उपस्थित होते. विवाहासाठी उभारलेला मंडप हा वॉटर लिलीच्या फुलांनी सजवला होता. जी फुले दीपिकालाही आवडतात. दरम्यान, 23 नोव्हेंबरला या जोडप्याने बंगरुळू येथे रिसेप्शन ठेवले आहे. तर, 28 नोव्हेंबरला मुंबईतही ग्रॅंड रिसेप्शनचे आयोजनक केले आहे.