बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड़ (Neha Kakkar) लवकरच बॉयफ्रेंड रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. काल नेहा-रोहनची रिंग सेरेमनी (Ring ceremony) पार पडली. या सोहळ्यात दोघांनीही धम्माल डान्स केला. यात नेहा-रोहनप्रीत दोघांचाही खास अंदाज पाहायला मिळत असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. रिंग सेरेमनीमध्ये दोघांनीही धम्माल डान्स केला आणि चाहत्यांची वाहवा मिळवली. सध्या सोशल मीडियावरही नेहा-रोहनची चर्चा असून त्यांच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Neha Kakkar Roka Ceremony: नेहा कक्कड़ आणि रोहनप्रीत सिंह चा झाला रोका कार्यक्रम, Watch Inside Video)
या व्हिडिओत नेहा आणि रोहन एकत्र डान्स करत एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत. या सोहळ्यासाठी नेहाने सफेद रंगाचा शर्ट आणि लाल रंगाचा स्कर्ट परिधान केला आहे. तर रोहन व्हाईट सूट आणि लाल पगडीत दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल भयानीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. चाहत्यांकडून या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे. (नेहा कक्कड़ आणि रोहनप्रीत सिंह चे हळदी समारंभातील सुंदर Candid फोटोज)
पहा व्हिडिओ:
View this post on Instagram
यापूर्वी नेहाने रोका, हळदी सोहळ्याचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यालाही चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता रिंग सेरेमनी मधील हा व्हिडिओ लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, नेहा आणि रोहनप्रीत 26 ऑक्टोबर रोजी विवाहबद्ध होतील. कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत मोहाली मध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडेल.