Neha Kakkar Haldi Ceremony: नेहा कक्कड़ आणि रोहनप्रीत सिंह चे हळदी समारंभातील सुंदर Candid फोटोज
Neha Kakkar And Rohanpreet Singh (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कड़ (Neha Kakkar) आणि रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या 26 ऑक्टोबरला दोघेही सप्तपदी घेणार असून आज यांचा हळदी समारंभ पार पडला. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा हळदी समारंभ (Haldi Ceremony) झाला. नुकतेच नेहा कक्कड़ हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या समारंभातील कॅमे-यात टिपलेले सुंदर क्षण शेअर केले आहेत. या फोटोमध्ये या दोघांच्या चेह-यावरील आनंद, उत्साह अगदी स्पष्टपणे दिसत आहे.

या हळदी समारंभासाठी पिवळ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर फुलांची ज्वेलरी घातली आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहेत. तर रोहनप्रीतने हळदीच्या रंगासारखा कुर्ता घातला आहे.

हेदेखील वाचा- Neha Kakkar Roka Ceremony: नेहा कक्कड़ आणि रोहनप्रीत सिंह चा झाला रोका कार्यक्रम, Watch Inside Video

पाहा नेहा कक्कड़ आणि रोहनप्रीस सिंह च्या हळदीसमारंभातील Candid Photos:

नेहा ने इन्स्टाग्राम #Nehudavyah वापरत आपला हळदी सेरेमनीचे फोटो शेअर केले आहेत. नेहा च्या लग्नपत्रिकेनुसार 26 ऑक्टोबरला या दोघांचा विवाह होणार आहे असे सांगण्यात येत आहे.

अलीकडेच तिचा रोका सेरेमनी सुद्धा झाला होता. नेहा आपल्या कुटूंबियांसह सध्या दिल्लीत आहे. दिल्लीतच तिचा आणि रोहनप्रीत सिंह चा शाही विवाह सोहळा होणार आहे.

नेहाचे तिचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहलीसोबत ब्रेक अप झाल्यानंतर तिचे नाव उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण सोबत जोडले गेले होते. मात्र तो केवळ शोचा TRP चा भाग होता असे नंतर सांगण्यात आले होते.