Neha Kakkar Mehndi Ceremony: नेहा कक्कड़ हिच्या हातावर रंगली रोहनप्रीत सिंह च्या नावाची मेहंदी (See Pics)
Neha Kakkar And Rohanpreet Singh (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड़ (Neha Kakkar) हिच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. बॉलिवूडची ही प्रसिद्ध गायिका लवकरच बॉयफ्रेंड रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) सोबत विवाहबद्ध होईल. दरम्यान, लग्नापूर्वीच्या विविध सोहळ्यांचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर चाहत्यांची पसंती मिळवत आहेत. आता नेहाच्या मेहंदी सोहळ्याचे (Mehendi Ceremony) फोटोज लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोत नेहा आणि रोहनप्रीत यांच्या मनातील आनंद प्रतीत होत आहे. तर काही फोटोत नेहाच्या हातावरील मेंहदी पाहायला मिळत आहे. खुद्द नेहाने हे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हे सुंदर फोटोज शेअर करताना नेहाने पोस्टमध्ये लिहिले, "मेहंदी लगाउंगी मैं सजना के नाम की" आणि यात रोहनप्रीतला टॅग केले आहे. या फोटोत नेहा-रोहनप्रीत हिरव्या रंगाच्या पारंपारिक पोशाखात दिसत आहेत. नेहाचा ड्रेस गडद हिरवा असून रोहनने पिस्ता शेडमधील शेरवानी आणि हिरव्या रंगाची पगडी परिधान केली आहे. (Neha Kakkar And Rohanpreet Singh Ring Ceremony: नेहा कक्कड़ आणि रोहनप्रीत सिंह यांचा रिंग सेरेमनीमध्ये धम्माल डान्स; Watch Video)

पहा फोटोज:

यापूर्वी नेहाच्या रोका, हळद, रिंग सेरेमनी यांचे फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. या सर्व फोटोंना चाहत्यांकडून पसंती मिळाली असून नेहाच्या लग्नाच्या फोटोची प्रतीक्षा सर्वजण करत आहेत. दरम्यान, नेहा आणि रोहनप्रीत यांचा विवाहसोहळा 26 ऑक्टोबर रोजी पार पडणार असून त्यासाठी कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवार उपस्थित राहणार आहेत.