बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मालदीव्स मधील फोटो शेअर करण्यावर संतापला नवाजुद्दीन सिद्दीकी, म्हणाला, 'थोडी तरी लाज बाळगा'
Nawazuddin Siddiqui (Photo Credits: Getty Images)

भारतात कोरोनाने कहर केला असून महाराष्ट्रात तर कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या कोरोनाने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे तर अनेकांचे संसार उघड्यावर पाडले आहेत. या काळात अनेकांच्या नोक-या लोक बेरोजगार झाले आहेत. अशा परिस्थिती बॉलिवूड सेलिब्रिटी मात्र देशाबाहेर मालदिव्सला (Maldives) जाऊन छान सुट्या एन्जॉय करत आहे. त्याचे सोशल मिडियावर फोटोज शेअर करुन त्याचे प्रदर्शन करणा-यांवर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui) मात्र सडकून टीका केली आहे. 'थोडी तरी लाज बाळगा' अशा शब्दांत नवाजुद्दीनने आपला राग व्यक्त केला आहे.

‘स्पॉटबॉय’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘नवाजला सेलिब्रिटींच्या सुट्टी आणि तिथून शेअर करत असलेल्या फोटोंबद्दल विचारण्यात आले.’ तेव्हा यावर बोलताना तो म्हणाला, ‘लोकांकडे अन्न नाही आणि आपण पैसे असे व्यर्थ करत आहात. थोडी तरी लाज वाटू द्या.’हेदेखील वाचा- Janhvi Kapoor चे मालदिव्स मधील Hot Swimsuit मधील फोटोज सोशल मिडियावर व्हायरल, See Pics

"या लोकांनी मालदीवचा तमाशा बनवला आहे. त्यांच्या पर्यटन उद्योगाची काय व्यवस्था आहे मला नाही माहित. पण माणूस म्हणून कृपया आपल्या सुट्टीचे फोटो तरी आपल्याकडे ठेवा सोशल मीडियावर शेअर करू नका. प्रत्येक व्यक्ती इथे कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतं आहे. जे आधीच अनेक समस्यांचा सामना करत आहेत, हे फोटो दाखवून त्यांना आणखी दु:ख देऊ नका." असा शब्दांत नवाजुद्दीन ने आपले परखड मत मांडले आहे.

एवढच नाही तर तो पुढे असे म्हणाला, "आपण कलाकारांनी मोठे होणे आवश्यक आहे. त्यामुळे मालदीवला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जाण्याची कोणतीच योजना नाही? मुळीच नाही. मी माझ्या कुटुंबासोबत माझ्या गावी बुधाणात आहे. हेच माझं मालदीव आहे."