Janhvi Kapoor चे मालदिव्स मधील Hot Swimsuit मधील फोटोज सोशल मिडियावर व्हायरल, See Pics
Janhvi kapoor (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिने 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि अल्पावधीतच तिने स्वत: चा चाहतावर्ग निर्माण केला. अलीकडेच तिचा 'रूही' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील तिचे काम प्रेक्षकांना प्रचंड आवडले. अलीकडेच ती अमेरिकेहून भारतात परतली. त्यानंतर ती पुन्हा आपल्या मित्रांसह मालदीव्समध्ये पोहोचली. मालदीव्समध्ये सध्या ती आपल्या दोस्तांसह एन्जॉय करत आहे. तेथील फोटोज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मालदीव्समधील स्विमस्यूटमधील तिचा हॉट लूक (Hot Swimsuit Look) सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

जान्हवीने आपल्या इन्स्टाग्रामवर मालदीव्समधील फोटोज शेअर केल आहेत. यात तिने सिल्व्हर रंगाचा हॉट स्विम स्यूट घातला आहे. यातील तिचा हॉट लूक चाहत्यांना प्रचंड आवडला. हे फोटोज सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.हेदेखील वाचा- Anushka Sharma ने घेतले Virat Kohli ला उचलून; पहा मजेशीर Video

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

समुद्रातील यॉटमध्ये सूर्यास्तासमोर उभी राहून तिने स्विमस्यूटमधील हॉट पोज दिल्या आहेत. हा अंदाज चाहत्यांना प्रचंड भावला. हे फोटोज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

मालदीव्ससध्या बॉलिवूडकरांसाठी बेस्ट हॉलिडे डेस्टिनेशन बनले आहे. बॉलिवूडपासून टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार मालदीव्समध्ये सुट्टी एन्जॉय करायला जाताना दिसतात.

जान्हवीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, ती लवकरच आपल्याला दोस्ताना 2 चित्रपटात दिसणार आहे. सोशल मिडियावरही जान्हवी प्रचंड सक्रिय असते.