बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ने मुलीच्या जन्मानंतर कामाला सुरुवात केली आहे. सेटवरील अनुष्काचे फोटोज काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. आता विरुष्काचा (Virushka) एक नवा व्हिडिओ (New Video) समोर येत आहे. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या अनुष्काने आज वर्ल्ड हेल्थ डे 2021 (World Health Day 2021) दिवशी एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती आपल्या फिटनेसचे प्रदर्शन करताना दिसत आहे. (Anushka Sharma चा आई झाल्यानंतरचा लूक पाहून सर्वांना बसेल आश्चर्याचा धक्का, See Pic)
या व्हिडिओत अनुष्काने पती विराट कोहली (Virat Kohli) ला चक्क उचलले आहे. पूर्ण ताकदीनिशी अनुष्काने विराटला 2-3 वेळा उचलले. हा मजेशीर व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत तिने लिहिले, "मी हे करु शकले?"
पहा व्हिडिओ:
View this post on Instagram
विरुष्काचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात दोघांमधील बॉन्डिंगही दिसून येते. यापूर्वी देखील त्यांचे अनेक फोटोज-व्हिडिओंना चाहत्यांचे भरभरुन प्रेम मिळाले आहे. (Virat Kohli-Anushka Sharma Daughter Name: विरुष्काच्या मुलीचं नाव आलं समोर, अनुष्का शर्माने पती विराट कोहलीसोबत शेअर केला लेकीचा गोंडस Photo)
11 जानेवारी रोजी अनुष्काने मुलीला जन्म दिला. ही गोड बातमी विराटने सोशल मीडिया माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर 'वामिका' असं मुलीचं नामकरण झाल्याचे अनुष्काने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले. दरम्यान, मुलीच्या जन्मानंतर अवघ्या दोन महिन्यांत अनुष्का कामावर परतली असून विराट कोहली आयपीएल सामन्यांसाठी चैन्नईत आहे.