नवरात्रोत्सव 2018 : बॉलिवूडच्या या '5' गाण्यांशिवाय अपूर्ण ठरतील गरबा नाईट्स !
नवरात्रीची टॉप 5 गाणी (File Photo)

आजपासून नवरात्रीला सुरुवात झाली. देशभरात देवीच्या आगमनाचा उत्साह आहे. त्याचबरोबर आज रात्रीपासून गरबा, दांडीयाचीही धूम असेल. यात लहानांपासून जेष्ठ्यांपर्यंत सर्वांचाच उत्साह दांडगा असतो. बॉलिवूडमधील काही गाणी सुरु होताच गरब्याच्या उत्साहाला वेगळाच रंग चढतो. तरुणाईत जोश उसळतो. तर बॉलिवूडच्या या गाण्यांशिवाय गरबा नाईट्स अपूर्णच ठरतील...

# नगाड़े संग ढोल बाजे

'रामलीला' सिनेमातील हे अतिशय गाजलेले गाणे. या सिनेमात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत होते. या गाण्यातील दीपिकाच्या डान्सचे भरभरून कौतुक झाले.

# शुभारंभ

'काई पो छे' सिनेमातील हे गाणे आहे. या सिनेमात सुशांत सिंग राजपूत, राजकुमार राव आणि अमित साध यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

# ढोली तारो ढोल बाजे

गरब्यातील सर्वात लोकप्रिय गाणे म्हणजे 'ढोली तारो ढोल बाजे.' 'हम दिल दे चुके सनम' सिनेमातील हे ठेका धरायला लावणारे गाणे. या सिनेमात अजय देवगण, ऐश्वर्या राय आणि सलमान खान हे स्टार्स होते.

# उड़ी उड़ी जाय

'रईस' सिनेमातील हे गाणे देखील गरबाप्रेमींच्या आवडीचे आहे. शाहरुख खान आणि माहिरा खान यात प्रमुख भूमिकेत होते.

# छोगाड़ा

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'लवयात्री' सिनेमातील हे गाणे चांगलेच गाजत आहे. सिनेमापेक्षा किंचित अधिकच लोकप्रियता या गाण्याला लाभली. या सिनेमात आयुष शर्मा आणि वरिना हुसैन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यंदा बॉलिवूडच्या या '4' नव्या गाण्यांवर नक्की रंगणार गरबा नाईट !