70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली.  आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी कलाकृतींनी विजेत्यांच्या यादीत आपली छाप सोडली आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार 'वाळवी'ला देण्यात आला. सचिन सुर्यवंशी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'वारसा' या चित्रपटाला सर्वोत्तम कला सांस्कृतिक चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  ज्येष्ठ पत्रकार, सिने अभ्यासक अशोक राणे यांच्या मुंबईतील गिरण्यांवरील माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 'आणखी एक मोहेनजोदारो' या सिनेमाला बेस्ट बायोग्राफिकल हिस्टोरिकल कम्पायलेशन फिल्म कॅटेगरीत अवॉर्ड मिळाला आहे. (हेही वाचा -  Navra Maaza Navsaacha 2: नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच)

परेश मोकाशी यांचं दिग्दर्शन असलेल्या 'वाळवी' सिनेमाला यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार चित्रपटांमध्ये तीन मराठी सिनेमांनी बाजी मारली आहे. 'वाळवी'बरोबरच आणखी दोन मराठी सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 'मर्मर्स ऑफ द जंगल' या मराठी सिनेमाला बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्मचा अवॉर्ड मिळाला आहे. 'वारसा' या माहितीपटालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

'कार्तिकेय' 2 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. 'पोनियिन सेल्वन 1' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. 'KGF Chapter 2' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. 'केजीएफ चॅप्टर 2' ला सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफीचा पुरस्कारही मिळाला. मनोज बाजपेयी यांना 'गुलमोहर'साठी स्पेशल मेन्शन पुरस्कार मिळाला.

पाहा पुरस्काराची यादी - 

- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - गुलमोहर

- सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म - सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - वाळवी

- राष्ट्रीय चित्रपटांवर मराठीची छाप

- साहिल वैद्य यांच्या 'मर्मर्स ऑफ द जंगल'ला दोन पुरस्कार

- साहिल वैद्य यांच्या 'मर्मर्स ऑफ द जंगल बेस्ट डॉक्यु्मेंटरी पुरस्कार

- 'मर्मर्स ऑफ द जंगल'ला बेस्ट नॅरेशनचाही पुरस्कार

- सचिन बाळासाहेब सूर्यवंशींच्या 'वारसा'लाही राष्ट्रीय पुरस्कार

- वारसा चित्रपटाला बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा पुरस्कार