National Cinema Day 2023: ओ..या! पाहा, फक्त 99 रुपयांमध्ये कोणताही सिनेमा, राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त खास ऑफर

Watch any movie for just Rs.99: 'ओ.. या.. या..या आणि पाहा कोणताही सिनेमा फक्त 99 रुपयांत. तोसुद्धा साधा सुधा नव्हे बरं..! चक्क थिएटरमध्ये', हेडींग आणि बातमीचे वाक्य पाहून आपणास नक्कीच असे वाटले असेल की, काय चाललंय हे? आता सिनेमाचाही सेल लागला की काय? पण सेल नसला तरी, याचे उत्तर आहे होय. अशा प्रकारे तुम्हाला खरोखरच सिनेमा पाहता येणार आहे. राष्ट्रीय चित्रपट दिन (National Cinema Day 2023) देशभरात दणक्यात साजरा होतो आहे. त्यामुळे या दिनाचे औचित्य साधून देशभरातील सिनेरसिकांना कोणत्याही सिनेमागृहात केवळ 99 रुपयामध्ये सिनेमा पाहता येणार आहे. अर्थात ही संधी केवळ मर्यादित कालावधीसाठी आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि देशभरातील सिनेसृष्टीने रसिकांसाठीअविस्मरणीय चित्रपट मॅरेथॉन ऑफर आणली आहे.

या आधीच्या वर्षीही अशीच ऑफर आणण्यात आली होती. ज्याला रसिक प्रेक्षकांनी मोठ्या धुमधडाक्यात प्रतिसाद दिला. ज्यामुळे केवळ एका दिवसात 6.5 दशलक्ष लोकांनी नोंदणी केली. या आत्मविश्वासपूर्ण अनुभवानंततर आता राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त 4000 हून अधिक स्क्रिनवर सिनेमा पाहायला मिळेल. देशभरातील सर्व वयोगटातील प्रेक्षकांना हा क्षण सिनेमाच्या माध्यमातून आनंदाच्या दिवसासाठी एकत्र आणतो.

ट्विट

PVR INOX, Cinepolis, Miraj, Citypride, Asian, Mukta A2, Movie Time, Wave, M2K, Delite आणि इतर अनेक दिग्गज चित्रपटगृहे राष्ट्रीय चित्रपट दिनाचा एक भाग आहेत.