Namrata Shirodkar Birthday: लग्नानंतर फिल्म इंडस्ट्री सोडून गृहिणी झालेली अभिनेत्री नम्रता शिरोडकर बद्दल जाणून घेऊया काही खास गोष्टी
Photo Credit: Instagram

मिस इंडियाचे विजेतेपद पटकावरी बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar ) हीने चित्रपटाच्या दुनियेतून माघार घेतली. नम्रता आज तिचा 49 वा वाढदिवस साजरा करीत आहे, तर मग जाणून घेऊया नम्रता शिरोडकर यांच्या जीवनाशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी नम्रता शिरोडकर हीचा जन्म 22 जानेवारी 1972 रोजी महाराष्ट्रातील ब्राह्मण कुटुंबात झाला. तिची मोठी बहिण प्रसिद्ध अभिनेत्री असून तिचे नाव शिल्पा शिरोडकर आहे. नम्रताची आजी मीनाक्षी देखील पूर्वीच्या काळातील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. नम्रता यांचे बालपण चित्रपटाच्या वातावरणात गेले आणि कदाचित यामुळेच त्यांचा वातावरणामुळे प्रभाव पडला आणि तिने अभिनय क्षेत्रात आपली कारकीर्द बनवण्याचा निर्णय घेतला. (Varun Dhawan and Natasha Dalal’s Wedding: वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या शाही विवाह लग्नसोहळ्याचे ठिकाण इथपासून ते लग्नविधींसंदर्भात 'ही' आहे इत्यंभूत माहिती )

करिअरची सुरुवात

मॉडेलिंग कारकीर्दीला सुरुवात करुन नम्रताने 1993 मध्ये मिस इंडियाचे विजेतेपद जिंकले. यावर्षी तिने मिस युनिव्हर्स स्पर्धेतही भाग घेतला होता आणि ती पाचव्या क्रमांकावर आली होती . 1998 मध्ये रिलीज झालेल्या सलमान खान अभिनीत 'जब प्यार किस से है है' चित्रपटातून नम्रताने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात ती एका छोट्या भूमिकेत दिसली होती.

'जब प्यार किसी से होता है' या चित्रपटा नंतर नम्रता संजय दत्तसोबत 'वास्तव' चित्रपटात दिसली. हा चित्रपट सुपरहिट ठरला. 'वास्तव'च्या शूटिंग दरम्यान तिचे महेश मांजरेकरसोबत प्रेमसंबंध होते. महेश मांजरेकर यांनी नम्रताला अनेक चित्रपटात भूमिका दिली, पण हे दोघे फार काळ टिकू शकले नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Namrata Shirodkar (@namratashirodkar)

साउथ सिनेमात एंट्री

नम्रताने पुकार, हेरा-फेरी आणि अस्तित्व या चित्रपटांमध्ये काम केले होते. तिला बॉलिवूडमध्ये मोठे स्थान मिळाले नाही.त्यानंतर तिने आपला मोर्चा दक्षिणच्या चित्रपटांकडे वळवला.२००० मध्ये साऊथ फिल्म 'वंशी' दरम्यान नम्रताची दक्षिण सुपरस्टार महेश बाबूशी (Mahesh Babu) भेट झाली .या भेटीनंतर दोघांचेही भेटणे वाढले नंतर त्याचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Namrata Shirodkar (@namratashirodkar)

लग्न

वयाने मोठी असूनही याचा त्यांच्या प्रेमावर काही परिणाम झाला नाही. 2005 मध्ये नम्रताने तेलगू चित्रपटांचा सुपरस्टार महेश बाबूशी लग्न केले. यानंतर नम्रता सिनेमाविश्वापासून लांब झाली. नम्रता आणि महेश बाबू यांना गौतम आणि सितारा अशी दोन मुले आहेत. नम्रता सध्या पती महेश बाबूसमवेत हैदराबादमध्ये राहते आणि ती संपूर्ण गृहिणी बनली आहे.याव्यतिरिक्त, ती आपल्या पतीच्या स्क्रिप्ट वाचण्यासाठी आणि त्यांचे मार्गदर्शन करण्याचे काम करते.