Naga Chaitanya Dating Life: अभिनेत्री Samantha Ruth Prabhu पासून वेगळे झाल्यानंतर नागा चैतन्य 'या' सौंदर्यवतीला डेट करत असल्याची चर्चा
Naga Chaitanya (संग्रहित संपादित प्रतिमा)

2021 मध्ये साऊथचा अभिनेता नागा चैतन्यने (Naga Chaitanya) अभिनेत्री समंथा रुथ प्रभूपासून (Samantha Ruth Prabhu) घटस्फोट घेतला. त्यांच्या विभक्त होण्याने चाहत्यांनाही दुःख झाले होते. आता हे दोघे वेगळे होऊन 8 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे व दोघेही आपापल्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. समंथा अजूनही तिच्या परिपूर्ण जोडीदाराच्या शोधात आहे, परंतु नागा चैतन्यचा हा शोध संपला असल्याचे दिसत आहे. सध्या नागा चैतन्य अभिनेत्री शोभिता धुलीपालाला (Sobhita Dhulipala) डेट करत असल्याची माहिती आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागा नुकताच शोभितासोबत त्याच्या नवीन घरात दिसला होता. तेव्हापासून दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. नागाने हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये नवीन घर घेतले आहे. सध्या या घराचे काम चालू असून, मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागा चैतन्य शोभिताला त्याचे आलिशान घर दाखवत होता. यावेळी दोघेही खूप खुश दिसत होते. घराला भेट दिल्यानंतर नागा आणि शोभिताही कारमधून एकत्र जाताना दिसले.

या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चर्चा आहे की दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. याआधी शोभिता धुलिपाला तिचा शेवटचा चित्रपट मेजरच्या प्रमोशनसाठी ज्या हॉटेलमध्ये थांबली होती त्याच हॉटेलमध्ये चैतन्यला अनेकवेळा पाहिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दोघांनीही त्यांच्या डेटींगबद्दल अद्याप काहीही सांगितलेले नाही. नागा अशा अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याला त्याचे वैयक्तिक आयुष्य कॅमेरासमोर आणणे फारसे आवडत नाही.

आता नागा चैतन्य आणि शोभिता यांच्यात खरेच काही शिजतेय की दोघे एकमेकांच्या सहवासात मैत्रीचा आनंद लुटत आहेत, हे वेळ आल्यावरच कळेल. दरम्यान, समंथा आणि नागा चैतन्य यांचा विवाह 6 ऑक्टोबर 2017 रोजी गोव्यात झाला होता. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून नागा चैतन्यपासून वेगळे झाल्याची माहिती दिली होती.