Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणी ड्रग्सच्या दृष्टीकोनातून तपास केला आहे. आज या प्रकरणी त्यांच्याकडून चार्जशीट सादर केली जाणार आहे. ही चार्जशीट 12 हजार पानी असून स्पेशल एनडीपीएस कोर्ट (Special NDPS court) कडे सादर केले जाईल. यामध्ये सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Actor Rhea Chakraborty) आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांचे देखील नाव असल्याची माहिती मिळाली आहे. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू 14 जून दिवशी झाला असून राहत्या घरी त्याचा मृतदेह आढळल्या नंतर ही हत्या की आत्महत्या असा प्रश्न विचारला जात आहे. Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या बहिणीला दिलासा नाही, रिया चक्रवर्तीने दाखल केलेली FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार.

ईडी कडून काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स लीक करण्यात आल्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये एनसीबीने केस रजिस्टर करत तपास सुरु केला आहे. या प्रकरणी अनेक ठिकाणी धाड टाकत सुमारे 30 जणांना एनसीबी कडून अटक देखील झाली आहे. चार्जशीट मध्ये 33 आरोपींची नावं आणि त्यांची स्टेटमेंट आहेत. 200 साक्षीदार आहेत. हार्ड कॉपी प्रमाणेच 50 हजार पानी डिजिटल फॉर्मेट मधील चार्जशीटदेखील सादर  करण्यात आली आहे.

ANI Tweet

अटक झालेल्यांमध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवती तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासोबत सुशांतच्या स्टाफपैकी मिरांडा आणि दीपेश सावंतचाही समावेश होता. यांच्यावर सुशांतसाठी ड्रग्स तस्करी केल्याचा आरोप होता. सध्या हे सारेच जामिनावर बाहेर आहेत.

दरम्यान सुशांतच्या निकटवर्तीयांसोबतच बॉलिवूडचे देखील अनेक बडे कलाकार एनसीबीच्या रडारवर होते. यामध्ये सारा अली खान, दीपिका पदुकोन यांच्यासोबत रकूल प्रित सिंह यांचा देखील समावेश होता. त्यांची देखील एनसीबी कार्यालयामध्ये चौकशी झाली आहे.