Sushant Singh Rajput (Photo Credits: Sachin Tendulkar/Twitter)

Sushant Singh Rajput Death Case: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणा संबंधित बॉम्बे हायकोर्टाने एका याचिकेवर आज सुनावणी केली. त्यानुसार रिया चक्रवर्ती हिने त्याच्या दोन बहिणींच्या विरोधात एफआयआर दाखल केली होती. त्यापैकी एका बहिणाला कोर्टाने दिलासा दिला असून दुसऱ्या बहिणीला दिलासा मिळालेला नाही. तर कोर्टाने मीतू सिंह हिचा एफआयआर रद्द केला आहे. पण प्रियंका वरील एफआयआर कायम असणार आहे. प्रियंका सिंह हिच्या विरोधातील आलेल्या निर्णयानंतर परिवाराचे वकील विकास सिंह सुप्रीम कोर्टात त्याला आव्हान देणार आहेत.

खरंतर रिया चक्रवर्ती हिने वांद्रे पोलीस स्थानकात 7 सप्टेंबर 2020 मध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची प्रियंका आणि नीतू या दोघी बहिणींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार सुशांतसाठी दिल्लीतील तरुण कुमार या डॉक्टरांसह त्याच्या दोन्ही बहिणींनी खोटे प्रिक्रिप्शन बनवल्याचा रिया हिने आरोप लावला आहे.(Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या बहिणींच्या विरोधातील याचिकेवर आज बॉम्बे हायकोर्ट जाहीर करणार निर्णय)

Tweet:

रिया हिने असा सुद्धा आरोप लावला की, सुशांतची मानसिक स्थिती जाणून न घेता औषध लिहिली गेली. तसेच सुशांतला 8 जूनला औषधांचे प्रिक्रिप्शन दिले गेले आणि 14 जूनला त्याने आत्महत्या केली. तर  सुशांत याच्या मृत्यूप्रकरणात जेव्हा ड्रग्ज कनेक्शनचा पर्दाफाश झाला तेव्हा बॉलिवूड मधील दिग्गज कलाकारांची नावे सुद्धा समोर आली होती. एनसीबीकडून आतापर्यंत या प्रकरणी 31 जणांना अटक करण्यात आली आहे. रिया चक्रवर्ती हिला सुद्धा अटक करण्यात आली होती. पण सध्या ती जामिनावर बाहेर आहे.